Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस व बीजापूर पोलीस यांची नक्षलवाद्यांसोबत चकमक, दोन जहाल नक्षल ठार व एक जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 गडचिरोली 23, डिसेंबर :-  उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येणा­रा  उपपोस्टे दामरंचा पासुन महाराष्ट्र – छत्तीसगड राज्याच्या सिमेपासुन 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकामेटा जंगल परिसरात नक्षलवादी मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेले असल्याच्या गोपनिय माहीतीवरुन गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-60) 300 जवान व डीआरजी पोलीस पथकाच छत्तीसगडचे 20 जवान हे संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दिनांक 23/12/2022 रोजीचे सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानंानी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. सदरची चकमक ही सुमारे 30 ते 45 मिनीटे चालु होती. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर 01 महिला नक्षल व 01 पुरुष नक्षल मृत अवस्थेत आढळले. मृत महिला नक्षलीची ओळख ही कांती लींगव्वा ऊर्फ अनिता, वय 41 वर्षे, रा. लक्ष्मीसागर, पोस्टे कडेम, जि. निर्मल राज्य तेलंगना येथील असल्याची माहीती प्राप्त झालेली आहे. ती सध्या डीव्हीसीएम (इंद्रावेली एरीया कमेटी) या पदावर कार्यरत होती. तीच्यावर महाराष्ट्र शासनाने 16 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच तेलंगना शासनाने 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच मृत महीला नक्षल ही मैलारापु अडेल्लु ऊर्फ भास्कर (तेलंगना राज्य समीती सदस्य व सचीव कुमारम भिम डिव्हीजन कमीटी) यांची पत्नी होती. सोबतच 01 अनोळखी पुरुष नक्षल मृतदेह व जखमी अवस्थेत असलेले 01 नक्षल मिळुन आले. जखमी नक्षलीचे नाव लचमया कुच्चा वेलादी वय 28 वर्षे, रा. टेकामेटा, छत्तीसगड असून तो सध्या जनमिलीशिया सदस्य म्हणुन नक्षलवाद्याकरीता काम करत होता.
तसेच घटनास्थळावर 02 नग एसएलआर रायफल, 01 नग भरमार रायफल व मोठया  प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर जंगल परिसरात सी – 60 पथकाचे जवान व डीआरजी पोलीस पथक यांचे संयुक्त नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठया प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलीस दल व बीजापूर पोलीस यांनी पहील्यांदाच अतिदुर्गम भागात नक्षलविरोधी अभियान राबविले असुन गुन्हा नोंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरु असुन पुढील तपास बीजापूर पोलीस यांचेकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर अभियान मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे साो., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता साो., व मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख साो. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल साो. यांनी कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण होऊन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भीषण अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू

…पुन्हा वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

Comments are closed.