Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ESRO MAGICA (इसरो मॅजिका) च्या मार्गदर्शनात शालेय विद्यार्थ्यांनी शोधले अंतराळातील अॅस्टरॉइड!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे 23, डिसेंबर :- ESRO MAGICA च्या मार्गदर्शनाखाली, IASC (International Asteroid Search Collaboration) द्वारे आयोजित लघुग्रह शोध मोहिमेदरम्यान ESRO MAGICA च्या विद्यार्थ्यांनी ५ लघुग्रह शोधले, IASC ने त्या लघुग्रहांना प्राथमिक लघुग्रह दर्जा दिला आहे.
ही शोध मोहीम १८ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रीत बोराड इयत्ता ५वी, रेनबो इंटरनॅशनल स्कूल पुणे, स्वराज गायधनी इयत्ता 7वी, बार्न्स स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नाशिक, करण लांबोळे इयत्ता7वी, विवेकानंद प्रतिष्ठान, दिवंगत बी.जी. शानभाग विद्यालय जळगाव व वैज्ञानिक प्रवीण वाकोडे यांना लघुग्रह शोधण्याचा मान मिळाला.सन २०२० मध्ये esro मॅजिका च्या अध्यक्षा, नासा चा IASP कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या जान्हवी दांगेटी यांनी शोधलेल्या asteroid ला provisional asteroid चा दर्जा IASC कडून देण्यात आला होता.

पुढील लघुग्रह शोध मोहिमेत सहभागी होण्यासाठी तुम्ही [email protected] संपर्क करू शकता. ESRO MAGICA ही एक स्पेसटेक स्टार्टअप, आहे जी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण देत आहे, ही एकमेव संस्था आहे जी 6 महिन्यांच्या आत शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेले साउंडिंग रॉकेट लॉन्च करणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

गडचिरोली पोलीस व बीजापूर पोलीस यांची नक्षलवाद्यांसोबत चकमक, दोन जहाल नक्षल ठार व एक जखमी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

…पुन्हा वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

 

Comments are closed.