Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर:पोलीस अधीक्षक अंकित गोयल

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने हॉस्पीटॅलिटी कोर्स व ऑटोमोबाईल कोर्स प्रशिक्षण व रोजगाराकरीता नियुक्ती झालेल्या १८० युवक युवतींना नियुक्ती प्रमाणपत्राचे वाटप व सत्कार समारंभाचा कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली११ऑगस्ट:गडचिरोली(GADCHIROLI) जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील बेरोजगार तरुणांना गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने हॉस्पीटॅलिटी कोर्स व ऑटोमोबाईल कोर्स प्रशिक्षण व रोजगाराकरीता नियुक्ती झालेल्या १८० युवक युवतींना नियुक्ती प्रमाणपत्राचे वाटप व सत्कार समारंभाचा कार्यक्रम बुधवारी ११ऑगस्ट ला पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे आयोजित करण्यात आला होता.पोलीस अधिक्षक(SP OFFICE GADCHIROLI) कार्यालयाच्या अधिनस्त नागरी कृती शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी  झालेल्या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल( SP ANKIT GOYAL) ,अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन प्रथम एज्युकेशन फॉऊंडेशनचे प्रमुख क्लस्टर हेड आशिष इंगळे, रिजनल अकॅडेमिक हेड हॉस्पीटॅलिटी टिमच्या भाग्यश्री दशमुखे आदीची उपस्थिती  होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हॉस्पीटॅलिटी व ऑटोमोबाईल प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे  पोलीस अधीक्षक अंकित गोयल   यांनी कौतुक केले  त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना पोलीस अधीक्षक गोयल म्हणाले ,गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, सदैव  तुमच्या पाठीशी राहील, आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करुन त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे राहणीमान उंचवावे. असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून हॉस्पीटॅलिटी, ऑटोमोबाईल प्रशिक्षण सुरक्षा रक्षक व नसिंग असिस्टंट म्हणुन आज पर्यंत १६६९ ग्रामीण गरीब व गरजु युवक-युवतींना प्रशिक्षण देवुन रोजगार उपलब्ध करून देण्यात आले. तसेच १९७ बेरोजगार युवकयुवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले यात सुरक्षा रक्षक म्हणुन ४१३ युवकांना आंध्रप्रदेश व तेलंगाणा येथे रोजगार मिळवून देण्यात आले. नर्सिंग असिस्टंट म्हणुन ११११ युवतींना महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या येथे रोजगार उपलब्ध करुन दिले, ८५ युवक युवतींना हॉस्पीटॅलीटी व ३६ युवकांना ऑटोमोबाईलचे प्रशिक्षण देऊन त्यांना महाराष्ट्र, गुजरात व गोवा याठिकाणी रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. असे एकुण १६६९ युवक- युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. त्यासोबतच ब्युटी पार्लर ३५, मत्स्य पालन २५, कुक्कुट पालन ३५, शेळी पालन ६७, शिवण काम ३५ असे एकूण १९७ युवक-युवतींना व्यवसाय प्रशिक्षण देवुन आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमके तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व अंमलदार यांनी  विशेष परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

सोलापुरातील सहाय्यक पोलिस आयुक्तांचा मृत्यू

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीकेसी येथे मियावाकी वनीकरणास सुरूवात!

 

“वंशाला दिवा पाहिजे” ही मागणी करत, चक्क सासू-सासऱ्याने सुनेला मारहाण करून, चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं.

Comments are closed.