Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलिसांची अवैध दारू वर मोठी कारवाई

पाच लाखाच्या वर अवैध दारू व मुद्देमाल जप्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली:  जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अंकुश लावण्यासाठी  काल दि. 23 जानेवारी रोजी महेश हेमके, हा चंद्रपूर वरून अवैध रित्या चारचाकी वाहनाने देशी व विदेशी दारूची चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतूक करून मोहझरी गावात राहणारा शिवा ताडपल्लीवार यास पुरवठा करणार आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन रात्री  गडचिरोली येथील सत्र न्यायालय समोरील चौकात सापळा रचून बसलेे असता,वाहनाची जवळून तपासणी केली.

त्यात अवैध देशी व विदेशी दारू असलेल्या 40 पेटी किंमत अंदाजे तीन लाख बत्तीस हजार आठशे  मिळून आल्याने सदर अवैध दारु सहित एक चारचाकी महिंद्र कंपनीचे झायलो वाहन क्र. एम. एच. 14 सी.एस. 4221 सह  मुद्देमाल जप्त केला आहे. गडचिरोली येथे इसम नामे 1) रंजीत अरुण सरपे, वय-25 वर्षे, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर, 02) चेतन देवेंद्र झाडे, वय-25 वर्षे, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर याचे विरुध्द कलम 65 (अ), 83, 98 (2) म.दा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच सदर गुन्हयात पाहिजे असलेले दोन आरोपी नामे 1) महेश हेमके, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, 2) शिवा ताडपल्लीवार रा. मोहझरी ता. जि. गडचिरोली यांच्या शोध घेणे सुरु असून सदर गुन्ह्राचा पुढील तपास सुरु आहे. सदरची कारवाई अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात, प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे आणि माणिक निसार यांनी पार पाडली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.