Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत पावसाने केला कहर… 

आलापल्ली-खमनचेरु या प्रमुख मार्गांवरील संपर्क तुटला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ९ जुलै : अहेरी उपविभागात तसेच जिल्ह्याच्या दक्षिण भागात आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे.

यामुळे ताडगाव-भामरागड, मुलचेरा-आष्टी, आष्टी-आलापल्ली, आलापल्ली-सिरोंचा वाहतूक बंद झाली असून, शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुलचेरा तालुक्यात आज पहाटे पाच वाजतापासून मुसळधार पाऊस पडत कोपरअली गावानजीकच्या दिना नदीला पूर आला आहे.

यामुळे मुलचेरा -आष्टी मार्ग बंद आहे. काही गावांतील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याची माहिती आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे वनविभागाचे हत्ती कॅम्प आहे. तेथे अनेक पर्यटक हत्ती पाहण्यासाठी जातात. परंतु कमलापूर-रेपनपल्ली मार्गावरील नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चौडमपल्ली नाल्याला पूर आल्याने आष्टी-आलापल्ली मार्ग बंद आहे. मेडाराम आणि बामणी नाल्याच्या पुरामुळे आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच तानबोडी नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने खमनचेरु आलापल्ली मार्गही बंद आहे. कुमरगुडा नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने ताडगाव-भामरागड मार्ग कालपासून बंद आहे. मागील चोवीस तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक १४१.४ -असल्याने मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल सिरोंचा तालुक्यात ११७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.