Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुसळधार पावसाचा सामना स्वीगी झोमॅटो डिलिव्हरी बॉइझ यांना देखील…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

ठाणे : गेले दोन दिवस ठाणे शहरामध्ये मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत असल्यामुळे अनेक घटकांवर या पावसाचा परिणाम दिसून आला. त्यातच ठाणे शहरामध्ये ठीक ठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य देखील होते. पाण्यातून वाट काढत चालणे हे नागरिकांना खूपच कठीण होत होते व रस्त्यावरती साचलेल्या पाण्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली.

याच पावसाचा सामना स्विगी झोमॅटो चे डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉईज यांना मोठ्या प्रमाणात करावा लागला. दोन दिवस मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत असल्यामुळे त्याच पावसातून वाट काढत आपले डिलिव्हरी पोहचवणे व वेळेच्या आत डिलिव्हरी देण्याच्या प्रयत्नात डिलिव्हरी बॉईज यांना मुसळधार पावसांत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे काहीवेळेस लांबच गाड्या लावून गुडघाभर पाण्यातून वाट काढत डिलिव्हरी करावी लागत आहे पावसाचा जोर जरी कायम असला तरीसुद्धा आम्ही एवढ्या पावसात डिलिव्हरी ही चोख पणे करत असतो परंतु पाणी साचले तर अधिकच कठीण होते. असे यावेळी डिलिव्हरी बॉईज यांनी सांगितले. तर साचलेले पाणी उपसायला सेक्शन पंप लावण्याची मागणीदेखील यावेळी या डिलिव्हरी बॉईज याकडून यावेळी करण्यात आले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शेकडो लोकांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचा राज्यपालांनी केला गौरव

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच स्टोन आर्ट कलाकृती

कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षांची मोर्चे बांधणीला सुरुवात

 

Comments are closed.