Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अपघातग्रस्त कुटुंबीयांना तातडीची मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 उरण 15 ऑक्टोबर :- उरण वायू विद्युत केंद्र येथे रविवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी  बॉयलर पंप स्फोट होऊन भयानक अपघात झाला. यामध्ये विवेक धुमाले (कायमस्वरूपी कामगार), कुंदन पाटील (डोंगरी, कायमस्वरूपी कामगार), विष्णु पाटील (बोकडविरा कंत्राटी कामगार) या तरुण कामगारांचा दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे त्या कुटुंबियांवर मोठे संकट आले आहे. त्यांना तातडीची मदत म्हणुन GTPS (महाजानको ) व  कंत्राटदार श्री सदानंद गायकवाड, श्री राठोड यांनी रु.१०,०००००/- (रुपये दहा लाख) धनादेश मयत कंत्राटी कामगार विष्णु पाटील यांची पत्नी व आई यांचे स्वाधीन श्री गरुड (HR हेड GTPS)व कंत्राटदार गायकवाड व राठोड यांनी दिले.

तसेच पत्नीला ESIC तहायात पेंशन (सुमारे रु. १६५००/-) विमा व इतर लाभ मिळणार आहेत. तसेच कायमस्वरूपी दोन कामगारांना लवकरच (मृत्यू दाखला आल्यावर ) मंजुरी घेऊन सरकारी नोकरी व आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. विष्णु पाटील यांची पत्नी MSEB कॉलनी मध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहे तिलाही सरकारी नोकरी व सर्व तीन मयत कामगारांचे कुटुंबीयांना रु.५०,०००००/- नुकसान भरपाई देण्याचे प्रस्ताव MD महाजनको याना पाठविले आहेत. त्याला मंजुरी मिळेल आशी अपेक्षा आहेच. त्याची प्रत आमदार जयंत पाटील व आमदार बाळाराम पाटील यांना दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी कामगार नेते कॉ.भूषण पाटील विश्वस्त जेएनपीटी, महादेव घरत, बोकडविरा सरपंच सौ.मानसी पाटील,माजी सरपंच भागवान पाटील, अध्यक्ष त्रिशूल ठाकूर, माजी अध्यक्ष सूर्यकांत पाटील, मनोज पाटील.किसान सभा नेते रामचंद्र म्हात्रे,डोंगरी गावाचे किरण घरत ,ग्रामपंचायत समस्या निर्मला पाटील, वंदना पाटील माजी उपसरपंच देवेंद्र पाटील, पराग ठाकूर भूपेश पाटील हे उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पालघरच्या रुद्राक्षने रचला। इतिहास

 

Comments are closed.