Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

7 दिवसात आलापली ते आष्टी मार्गाची तात्काळ दूरूस्ती करा..!!

अन्यथा तीव्र आंदोलन करू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  अजयभाऊ कंकडालवार व माजी जि.प.अध्यक्ष रविभाऊ ओलालवार यांचा इशारा..!!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. २१ ऑगस्ट : सुरजागड लोह प्रकल्पामधून दैनंदिन शेकडो ट्रका द्वारे क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने  “रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते” अशी बिकट अवस्था झाली असून सात दिवसाच्या आत दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार यांनी अहेरी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सुरजागड लोहप्रकल्प विरोधात आधीच जनमानसात विरोध असताना ही लोहप्रकल्प सुरू करण्यात आला असून दररोज कच्चा लोह दगड क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केले जात असल्याने महामार्गावर रस्त्याच्या मधात मोठे मोठे भगदाड पडले आहेत. आष्टी ते अल्लापल्ली  45 किलोमीटर अंतर आहे . ते अंतर एका तासात कापता येत होते मात्र त्याच अंतराला दोन तास लागत आहेत .याशिवाय मोटार सायकल वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कच्चा लोह दगड ट्रकने घेऊन जाणारे जड वाहन रोडच्या कडेला भसण्याच्या भीतीने साईट देत नसल्याने कित्येकदा अपघात झाले आहेत तर कित्येकांना धुळीचे कण गेल्याने डोळ्यात गेल्याने त्रास सहन करावा लागला आहे .एवढेच नव्हे तर कित्येकांना कमरीचे, मणक्या च्या आजाराने ग्रासलेले आहे. आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास चंद्रपूर किंवा गडचिरोली गेल्याशिवाय रुग्णांना आधार मिळत नाही. मात्र रस्त्याच्या या बिकट परिस्थितीमुळे रुग्णांना फटका बसतोय. वेळेवर पोहोचता येत नसल्याने दगा फटका होण्याची ही दाट शक्यता निर्माण झालेली आहे .

याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी मानव मिशन अंतर्गत मुलींसाठी मोफत प्रवास दिला जात आहे. मात्र “रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते” अशी बिकट अवस्था झाल्याने एसटी महामंडळाने एसटी बंद केल्याचे निदर्शनास आले होते. दैनंदिन कामासाठी ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहेत तर दुसरीकडे शेकडो नागरिकांना डोळ्यात धुडीचे कण जाऊन तर मणक्याचे कमरीचे दुखणे वाढले असून आजाराने ग्रासले आहे.त्यामुळे आलापली ते आष्टी मार्गावरील तात्काळ खड्डे बुजवून महामार्गाची दुरुस्ती करावी. अन्यथा   (7) दिवसांत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कंकडालवार यांनी दिला आहे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अहेरी तहसीलदार यांना निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व बोरीचे सरपंच शंकर कोडापे,राजपुर प्याच सरपंचा वेलादी म्याडम,नितीन गुंडावार, खमनचेरुसरपंच शायलू मडावी,महागाव,लगाम ग्राम पंचायतीचे सरपंच, सुरेश गंगादरीवार,सोयल पठाण,पांडुरंग रामटेके,रावी नेलकूद्री,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी तसेच सर्व ग्रा.प.सरपंच उपसरपंच सदस्य गण उपस्तीत राहून अहेरीचे तहसीलदार साहेब यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी साहेबाकडे पाठवले आहे.

हे देखील वाचा : 

नगर परिषद समांतर कार्यालय प्रकरणात गुन्हा दाखल नाही ; तक्रारीला तीन वर्षे झाली

 

 

Comments are closed.