Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

३ दिवस झाले तरी गुन्हा दाखल नाही! पोलिसांची डोळेझाक, महावितरणचा गलथान कारभार; तनिष्का कांबळेला न्याय कधी मिळणार? जनतेचा सवाल…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर, दि. २१ ऑगस्ट: महावितरणच्या गलथान कारभाराचा बळी ठरलेल्या तनिष्का कांबळे ( वय – १५ वर्षे ) हिला मृत होऊन ३ दिवस झाले तरीही अद्यापपर्यंत कुणाविरुद्धही गुन्हा दाखल झालेला नाही. ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे.पोलीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत? असा जनसामान्यांतून प्रश्न विचारला जात आहे.

खाजगी शिकवणी वर्गाला शिकवणीसाठी जाणाऱ्या तनिष्काने साचलेल्या पाण्यात पाय ठेवताच तनिष्काला विजेचा झटका लागला. याठिकाणी महावितरणच्या केबल पडल्या होत्या. केबल उघड्या असल्याने त्यातून वीज प्रवाह पाण्यात उतरला. हाच जोराचा झटका लागून तनिष्काला आपले प्राण गमवावे लागले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रकारानंतर महावितरणच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली. समाज माध्यमानीही हा विषय उचलून धरला. संबधीत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी जनतेने मागणी केली. आजमितीस गुन्हा दाखल झालेला नाही.

याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी असे सांगितले की, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत अभियंत्यांमार्फत स्वतंत्र चौकशी केली जात आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतरच कारवाई केली जाईल. सध्या अपमृत्यू म्हणून या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

नगर परिषद समांतर कार्यालय प्रकरणात गुन्हा दाखल नाही ; तक्रारीला तीन वर्षे झाली

7 दिवसात आलापली ते आष्टी मार्गाची मार्गाची तात्काळ दूरूस्ती करा..!!

 

Comments are closed.