कल्याण आणि एलटीटी रेल्वे स्थानकात, बॅगेज स्कॅनिंग आणि रॅपिंग सुविधा.
रेल्वे प्रवाशांना रेल्वे परिसरात आपल्या बॅग किंवा सामान निर्जंतुकीरण करता येणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्याकरीता मध्य रेल्वेकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता मध्य रेल्वेच्या कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात (एलटीटी) प्रवाशांच्या बॅग आणि सामान स्कॅनिंग आणि रॅपिंगची सुविधा देण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वे परिसरात आपल्या बॅग किंवा सामान निर्जंतुकीरण करता येणार आहे.
मध्य रेल्वेने पुणे विभागातील ‘कॅप्टन अर्जुन’, नागपूर विभागातील स्वयंचलित तिकिट तपासणी व प्रवेश व्यवस्थापन या सारख्या कोविड १९ च्या दृष्टीने प्रवाशांच्या आणि रेल्वे कर्मचार्यांच्या सुरक्षेचा विचार करून फेब्रीआय थर्मल बॉडी स्क्रीनिंग आणि मुंबई विभागातील वैद्यकीय सहाय्यक ‘जीवक’ आणि ‘रक्षक’, सोलापूर विभागात वैद्यकीय सहाय्यक (रो) बॉट आवृत्ती १ आणि २ असे अनेक अभिनव उपाय केले आहेत. आता कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात मध्य रेल्वे एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आहे.
प्रवाशांना त्यांच्या प्रवासात कोविड साथीचा आजार पाहता, सामानाची सफाई आणि पॅकिंगच्या सुविधांमुळे त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. यामध्ये अल्ट्रा व्हायोलेट (यूव्ही) किरणांद्वारे परवडणार्या दराने सॅनिटायझिंग प्रदान केले जाते आणि बॅगेजच्या आकाराच्या आधारे, सॅनिटायझिंग शुल्क निश्चित केले जाते. मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रथम उपलब्ध झालेल्या या सुविधेस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कल्याण व लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांनंतर दादर, ठाणे आणि पनवेल स्थानकांवरही ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Comments are closed.