२५ नोव्हेंबरपासून इंदू मिल, चैत्यभूमी खुले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर डेस्क, दि. २० नोव्हेंबर: यावर्षी दादर, चैत्यभूमी, मुंबईला जाणार्या आंबेडकरी अनुयायांकरिता खुश खबर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला २६ नोव्हेंबर रोजी संविधान सादर केले होते. त्याचे औचित्य साधून . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरपासूनच चैत्यभूमी, इंदू मिल खुली करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर्षी मुंबई, चैत्यभूमीला जाण्याकरिता विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबर २०२० रोजी आंबेडकर भवनला भेट दिली होती. त्यावळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते की, प्रत्येक वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राज्यातील आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमी येथे आदरांजली अर्पण करण्यास जात असतात. त्याकरिता आगामी२५ नोव्हेंबर २०२० ला चैत्यभूमी, राजगृह, शिवाजी पार्क, इंदु मिल खुली करण्यात येईल. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी नागपूरहून चैत्यभूमीकरिता विशेष रेल्वेगाड्या सोडण्याबाबतही चर्चा केली.
या विशेष रेल्वेगाड्यांमध्ये नागपूर-मुंबई सविधान एक्सप्रेस दि.३-१२-२०२० ला दुपारी १२:००वाजता, नागपूर- मुंबई महामाया एक्सप्रेस दि. ३-१२-२०२० रात्री ९: ५०वाजता, बल्लारशा- मुंबई चैत्यभूमी एक्सप्रेस दि. ४-१२-२०२०ला रात्री१: ३० वाजता, अकोला -मुंबई सिध्दार्थ एक्सप्रेस दि. ४-१२-२०२० ला सायंकाळी ६: ००वाजता, नागपुर – मुंबई दीक्षाभूमी एक्सप्रेस दि. ४- १२-२०२० ला रात्री ८: ३५ वाजता, हावडा -मुंबई आम्रपाली एक्सप्रेस दि. ५-१२-२०२०ला दुपारी २: ०० वाजता, गोदिंया -मुंबई विदर्भ एक्सप्रेस दि. ५-१२-२०२० ला रात्री ८: ३०वाजता, नागपूर- मुंबई विशाखा एक्सप्रेस दि. ६-१२-२०२० ला रात्री १२:२४ वाजता, अकोला -मुंबई पॅसेंजर दि. ६-१२-२०२० ला रात्री १:३० वाजता आणि वर्धा – मुंबई शुध्दोधन एक्सप्रेस रात्री ३-०० वाजता सुटणार आहेत.
Comments are closed.