Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरेगाव येथे जागतिक महिला दिन साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वडसा, दि. ९ मार्च: तालुक्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या कोरेगाव येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास नंदेश्वर यांनी स्थानिक गावातील अंगणवाडी केंद्रात महिलांना मार्गदर्शन केले. देशभरात महिलांवर होणारे अत्याचार, हुंडाबळी, लिंग भेद, भ्रुण हत्या याशिवाय मुलींना शिक्षण देऊन मुली शिकवा, मुली वाचवा, महिलांचे अधिकार, शासकीय योजना, इत्यादी विषयांवर मुद्देनिहाय मार्गदर्शन केले. जगभरात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून त्याला आळा बसण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. घराच्या बाहेर कामानिमित्य जात असतांना नियमित मास्क वापरणे, गर्दीत जाणे टाळावे, सोशल डिस्टन्सचे पालन करावे ईत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी सुमन लाडे, रेषनाबाई लाडे, लिलाबाई जांभुळकर, अनीता गेडाम, निराशा मेश्राम, दिपाली डोंगरवार, चांगुल वालदे, चांदणी रामटेके, येवलोका बुल्ले आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाचे संचालन सुरेखाबाई सहारे तर आभार प्रदर्शन गोपीका सहारे यांनी मानले.

Comments are closed.