Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आर्यन खान प्रकरणात तपास योग्य पध्दतीने झाला नाही

एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात पाठवले अहवालात उल्लेख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 19 ऑक्टोबर :- अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने झाला नसल्याचा एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात पाठवलेल्या अहवालात याचा उल्लेख आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या त्रुटींच्या अहवालानुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या विशेष तपास पथकाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात पाठवलेल्या या अहवालात या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावेळी जे अधिकारी कार्यरत होते ते आज ही कार्यरत आहेत. त्यांच्या कामातील अनेक त्रुटी तपासादरम्यान समोर आल्याचा दावा ही अहवालात करण्यात आला आहे. या प्रकरणात सात ते आठ अधिकार्यांची भुमिका तपास पथकाला संशयास्पद वाटली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आर्यन खान प्रकरणात 65 जणांचे चार वेळा जबाब नोंदविण्यात आले. कारण वेळोवेळी जबाब बदलल्या जात होते तसेच या गुन्ह्याचा तपास करतांना इतर गुन्ह्यात ही तफावत आढळली. एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात या सर्वांचा अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणात देवाण घेवाणीबाबत पूर्ण तपास झाला नाही. कारण तक्रारदाराने जबाब फिरवला असून आर्यन खानला जाणूनबुजून टार्गेट केल्याचे तपासात समोर आले आहे.

काॅर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात ज्या सात ते आठ एनसीबीच्या अधिकार्यांची भुमिका संशयास्पद होती, त्यांच्यावर विभागीय कारवाईला सुरूवात झाली आहे. या अधिकार्यांची संशयास्पद भुमिका ही इतर एक दोन गुन्ह्यात ही आढळून आली आहे. जे एनसीबीच्या बाहेर आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांकडे परवानगी मागितली आहे. या प्रकरणात पुराव्या अभावी तपास झाल्याची माहिती देखिल समोर आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईहून गोव्याला जाणार्या काॅर्डिलिया क्रुझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा सहित अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यन खान ला बरेच दिवस तुरूंगात राहावे लागले होते. हे प्रकरण देशभरात गाजले होते. त्यानंतर आर्यन खान सह सहा जणांना क्लीनचिट मिळाली होती.

हे पण वाचा :-

सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार – अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण

भाजपाचे राम व रेखा यादव यांचा शिंदे गटात प्रवेश

 

 

Comments are closed.