Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात लागली थंडी चाहुल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 08 नोव्हेंबर :- यंदा दीर्घकाळ पावसाळा होता. त्यामुळे आता राज्यात अगदी हळुवार थंडीची चाहुल लागतांना दिसत आहे. देशाच्या उत्तर भागात चांगलीच थंडी पहावयास मिळत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या बहुतांश भागांमध्येे थंडी जाणवू लागली आहे. काही भागांमध्ये हिमवृष्टीलाही सुरूवात झाली आहे.  उत्तरेकडील राज्यांमध्ये सुरू झालेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रात ही दिसत आहे. पुणे, सातारा भागांमध्ये तापमानात घट होउन हळुवार थंडी पहावयास मिळत आहे. मुंबई, नवी मुंबई भागातही रात्रीच्या तापमानात घट झाल्याचे दिसत आहे.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र सह कोकण आणि गोव्यातही थंडीला सुरूवात झाली आहे. आंबोली घाट परिसरात किमान तापमान 17 अंश तर कोल्हापुरात ही किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील महत्वाच्या गिरीस्थानांपैकी एक असणार्या महाबळेश्वर येथे ही किमान तापमान 13 अंशापर्यत पोहचले आहे. सध्याचे हवामान आणि कोरोनाचे शिथिल करण्यात आलेले निर्बंध पाहता पर्यटनाच्या दृष्टीने अनेकांनी वाई, पाचगणी, भिलार, भोसे, महाबळेश्वर भागांना भेेट देण्याचे प्रमाण वाढते आहे.  हवेत अणारा अल्हाददायक गारवा, सकाळच्या वेळेत रस्त्यांवर दरीतुन येणारे धुके आणि एकंदर वातावरण पाहता महाबळेश्वरच्या दिशेने येणार्या पर्यटकांच्या संख्येत आगामी दिवसात वाढ होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.