Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्पर्श अंतर्गत जिल्हयात कुष्ठरोग जनजागृती मोहिमेस सुरवात

30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी कालावधीत कुष्ठरोग पंधरवडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. 02 फेब्रुवारी : जिल्हयात कुष्ठरोग निवारण दिनाचे औचित्य साधून 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कुष्ठरोग पंधरवाडांतर्गत कुष्ठरोग जनजागृती मोहीमेस सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हयातील संपूर्ण तालुक्यात जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात आहे. जनजागृतीचा उद्देश म्हणजे, समाजातील लोकांमध्ये कुष्ठरोगबाबत जे गैरसमज, अंधश्रध्दा व भीती दूर करून हा आजार इतर आजारासारखाच सामान्य आजार आहे, ही भावना त्यांच्या मनात रुजविणे हा होय.

त्याअनुषंगाने दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या पंधरवडयात जिल्हयातील सर्व तालुक्यात जनजागृतीबाबत विविध कार्यक्रम घेतले जात आहे. त्यामध्ये निबंध स्पर्धा, शाळेमध्ये प्रभात फेरी काढून प्रार्थनेच्या वेळेस मुलांना कुष्ठरोगाच्या शपथेचे वाचन, कुष्ठरोगाच्या लक्षणाबाबत माहिती देऊन वर्ग 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांची कुष्ठरोग व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. गाव व खेडयामध्ये बचत गट, महिला मंडळ, आठवडी बाजार, विटभट्टया आदी ठिकाणी कुष्ठरोगबाबत शास्त्रोक्त माहिती देवून तपासणी करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच शहरी भागात मजुर अड्डा, कृषी उत्पन्न बाजार समिती व विशेष कार्यक्रमांच्या ठिकाणी कुष्ठरोग जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

आपल्या शरीरावर कोणताही चट्टा आढळून आल्यास तातडीने तपासणी करण्याकरीता आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालय तसेच चंद्रपूर,सामान्य रुग्णालयातील खोली क्रमांक 48 मध्ये भेट द्यावी. जेणेकरून, विहित वेळेत निदान होवून औषधोपचार सुरू झाल्यास कुष्ठरोगांवर प्रतिबंध घालता येईल, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा ‘: 

बॉल-बॅडमिंटन खेळाडु विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा अभाविप चा इशारा

औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा ‘मैत्री’ कायदा – उद्योगमंत्री उदय सामंत

6 फेब्रुवारी ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

 

Comments are closed.