Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रम्हपुरी महोत्सव निमीत्ताने महा आरोग्य शिबीराचे आयोजन

माजी मंत्री वडेट्टीवार यांचा पुढाकार - मोफत नेत्र, महिलांचे कॅन्सर तपासणी व शस्त्रक्रिया

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

ब्रम्हपुरी, दि. ९ जानेवारी: सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक व आरोग्य अशा विविध समाज उपयोगी सामाजिक कार्याचा वारसा जपणाऱ्या ब्रह्मपुरी महोत्सव- 2023 चे आयोजन दि. 12 ते 15 जानेवारीला आयोजित केले आहे. याच महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी व राज्याची माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे मोफत नेत्र तपासणी, स्त्रियांचे कॅन्सर तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजित दोन दिवसीय शिबिरात शिबिराच्या पहिला दिवस दि. 13 जानेवारी रोजी मोफत नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप, गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप, मोतीबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया, स्त्रियांचे स्तनाचे गाठीची मॅमोग्राफी मशीन द्वारे तपासणी, गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची स्मिअरद्वारे तपासणी, मोफत सोनोग्राफी व इतर रक्त चाचणी व उपचार करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आयोजित शिबिराकरिता डॉ. महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांची चमू तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल नागपूर येथील सुसज्ज असलेली कॅन्सर तपासणी मोबाईल व्हॅन पाचारण करण्यात येणार असून नाक, कान, घसा तपासणी, दंतरोग व महिलांची कॅन्सर तपासणी उपकरणे व पथोलॉजी विभाग स्वतंत्र आहे महिलांची स्तनाच्या कॅन्सर साठी मेमोग्राफी, गर्भाशयाचे कॅन्सर करिता डिजिटल व्हिडिओ कोलपोस्क्रोपी, तोंडाचे कॅन्सर तपासणी करिता सुविधा व कॅन्सर हॉस्पिटलच्या वरील अनुभवी डॉक्टरांची चमू हजर असणार आहे.

तर शिबिराच्या दुसरा दिवस 14 जानेवारी रोजी दंतरोग तपासणी व उपचार, नाक, कान, घसा तपासणी, हायड्रोसिल व हर्निया तपासणी व मोफत शस्त्रक्रिया, हृदयरोग तपासणी व उपचार एक्स-रे, सोनोग्राफी, व ईसीजी करण्यात येणार आहे. सदर शिबिराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर व शरद पवार दंत वैद्यकीय महाविद्यालय वर्धा येथील अशा दोन सुसज्ज डेंटल व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार असून तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी करण्यात येईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच हर्निया व इतर सर्जरी रुग्णांची तपासणी करून दिनांक 15 ते 18 जानेवारी पर्यंत मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात येईल. सदर महाआरोग्य शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मपुरी महोत्सव समिती ब्रह्मपुरी च्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : 

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिरोली यांची दुर्गम कसनसूर गावाला भेट

 

थंडीची लाट : विदर्भात थंडीची लाट अपेक्षित

Comments are closed.