Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

थंडीची लाट : विदर्भात थंडीची लाट अपेक्षित

महाराष्ट्र गारठणार_पारा एक आकडी राहण्याची शक्यता.!!!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर 09 , जानेवारी :-  हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात सर्वत्र पारा एक आकडी राहण्याची शक्यता आहे.9 जानेवारीनंतर उत्तर मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, आणि गडचिरोली जिल्ह्यात थंटीच्या लाटेचा अंदाज आहे. सोमवारपासून त्यात आणखी वाढ होणार आहे. 9 जानेवारीनंतर तापमानाचा पारा 2 ते 4 अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात थंडीची प्रचंड लाट येऊ शकते.

चंद्रपुरात चार दिवसांपासून तापमानात घट झाले आहे. आज चंद्रपूर जिल्ह्याचा पारा 12 अंशावर पोहोचला असून, विदर्भात सर्वांत कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि मराठवाड्यातील औरंगाबाद तसेच जालन्यात 9 जानेवारीनंतर एक अंकी तापमानाची शक्यता आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणामबदलत्या हवामानामुळे पिकांवर परिमाण जाणवणार आहे. सध्या धान पिकांचे परे पेरली असून, गारव्यामुळे पऱ्यांची वाढ खुंटून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे. गारठा वाढल्याने फुलकोबी पिकांवर अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

मुंबई- पुण्यातील हवा प्रदूषित राहणारमुंबईतील हवा मागील दोन दिवसांपासून अतिशय वाईट श्रेणीत मोडत आहे. पुढील दोन दिवस मुंबईचा एक्यूआय 300 पार जाणार असल्याचा अंदाज हवा गुणवत्ता निरीक्षण करणारी संस्था ‘सफर’ने वर्तवला आहे. पुण्यातही हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत असून, सरासरी एक्यूआय 215 च्या वर आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

अखेर वनविभागाने सर्व्हे नंबर 21, 100 वर मिळविला ताबा

नक्षल्यांनी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यासह सहा वनकर्मचाऱ्याला मारहाण करीत दुचाकीची केली जाळपोळ

 

Comments are closed.