Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“लसीकरणाबाबत केंद्र सरकारवर खोटे आरोप करणाऱ्या व लसीकरण मोहिमेचा महाराष्ट्रात फज्जा उडाल्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा “- आ. अतुल भातखळकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २० जानेवारी: कोरोना विरुद्धच्या लसीकरण मोहिमेला मुंबईसह राज्यात मोठी खीळ बसली असून मुंबईत काल दिवसभरात केवळ 13 लोकांना व राज्यभरात केवळ १८१ लोकांनाच कोरोना लस देण्यात आली आहे. राज्यात 9.83 लाख लसी उपलब्ध असताना सुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी लस कमी देण्यात आल्याची रड करत केंद्राकडे बोट दाखविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळेच राज्यात लसीकरण मोहीम सपशेल अपयशी ठरली असून, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य व अजब-गजब कारभारामुळे महाराष्ट्र देशाचा कोरोना कॅपिटल बनला आहे. कोरोना संसर्ग व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत दुर्दैवाने आजही महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य असून, राज्याचा मृत्यदर आज ही 2.54% इतका आहे तसेच मागील महिन्याभरात देशातील कोरोना रुग्णांचा दर झपाट्याने कमी होत असला तरीही आज सुद्धा देशातील एकूण रुग्णांपैकी 42% टक्के रुग्ण हे केवळ महाराष्ट्र व केरळ या दोनच राज्यातील असून मृत्युदराच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र देशात क्रमांक एक असल्यामुळे राज्य सरकार कडून लसीकरण मोहीम अधिक गांभीर्याने घेऊन जलद व नियोजनबद्ध लसीकरण मोहीम राबविण्याची आवश्यकता होती परंतु तसे न करता केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचेच काम राज्याकडून करण्यात येत आहे. मुंबईतील जेजे या एकाच रुग्णालयात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. हीच अवस्था राज्यभर आहे, काल संपूर्ण महाराष्ट्रात केवळ 181 लोकांनाच लस देण्यात आली आहे. तसेच राज्यसरकार व मुंबई महापालिका यांच्यात समन्वय नसल्यामुळे शनिवार व रविवार या दोन दिवशी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी ‘इतके कमी लसीकरण होणे यात काहीही विशेष बाब नाही’ असे बेशरम वक्तव्य केले. अकार्यक्षम सरकार अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कोरोना विरुद्धच्या लसीकरण कार्यक्रमात सुद्धा आपली अकार्यक्षमता कायम ठेवली आहे, असा आरोप सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्य सरकारकडून हीच ‘गती’ कायम ठेवण्यात आली तर महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला लस मिळण्यास किती कालावधी लागेल याचा विचार राज्य सरकारने केला आहे काय? असा प्रश्न सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.