Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जांभुळखेडा-पुराडा पुलावर हुतात्मा स्मृती स्थळ उभारणार – दत्ता शिर्के

जनसंघर्ष समिती आणि जांभुळखेडा, लेंढारी, पुराडा ग्रामस्थांनी विर बलिदानी पोलीस जवानांना वाहिली श्रद्धांजली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

कुरखेडा, दि. १ मे : सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत आहेत म्हणून देश सुरक्षित आहे आणि या दंडकारण्यात पोलीस नक्षली करवायांविरोधात आपल्या पुढे ढाल बनून उभे आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. नक्षली कारवायांत हौतात्म्य पत्करणाऱ्या विर पोलीस जवानांच्या स्मृती जपणे आणि त्यांची प्रेरणा घेणे आपले कर्तव्य आहे. या स्थळावर हुतात्मा स्मृती स्थळ उभारून नावयुवकांना प्रेरणा देण्याचे कार्य आपल्याला पार पडायचे आहे, असे आवाहन जनसंघर्ष समिती, नागपूर चे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी केले.

जनसंघर्ष समिती नागपूर आणि जांभुळखेडा, लेंढारी, पुराडा ग्राम पंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने रविवारी १ मे रोजी जांभुळखेडा-पुराडा पुलावर विर बलिदानी पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा चेतना मंच चे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश महाडिक, जांभुळखेडा च्या सरपंच राजबत्ती जगदीश नैताम, उपसरपंच गणपत महादेव बन्सोड, देवनाथ जयराम नैताम, कल्पना अरविंद नंदेश्वर, मनीषा येनिदास कवरके, राधाताई श्यामराव हलामी, पुंडलिक रतन राऊत आणि समस्त नागरिक तसेच जनसंघर्ष समितीचे अभिषेक सावरकर, अनंत सयाम, रितीक तल्हार, प्रशांत शेंडे, प्रवीण खापरे उपस्थित होते.

१ मे २०१९ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पुराडा-जांभूळखेडा गावादरम्यानच्या एका लहानशा पुलावर नक्षल्यांनी घातपात करत केलेल्या भूसुरूंग स्फोटात महाराष्ट्र पोलीसांचे १५ जवान आणि एक चालकाने हौतात्म्य प्राप्त झाले. या वर्षी १ मे २०२२ रोजी त्या दु:खद घटनेला तिन वर्षे पूर्ण झाली. त्याअनुषंगानं पुराडा-जांभूळखेडा पुलावर विर हुतात्मा स्मृती स्थळावर हौतात्म्य पत्करणाऱ्या पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी घटनेचे प्रत्यक्ष दर्शी नागरीकांनी आपले अनुभव कथन केले. याप्रसंगी संभावित स्मृती स्थळाचा आराखडा सांकेतिक रुपात उभारण्यात आला होता. रस्त्याने जाणारे नागरिक थांबून जवानांना श्रध्दांजली वाहत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

आमच्या पिढीसाठी जिल्हा परिषद नेतृत्व उभारणारी शाळा : डॉ. नितीन राऊत

 

 

Comments are closed.