Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पैसे थकले म्हणून मुकदमाने ऊसतोड मजुरांना मुलांसह डांबून ठेवले… 

डांबून ठेवल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. मजुरांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड, दि. १ मे : साखर कारखान्याचा पट्टा पडून आठ दिवस झाल्याने मजुरांकडे पैसे थकले म्हणून एका  मुकादमाने ऊसतोड मजुरांनाच आठ दिवसापासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्व मजूर गेवराई तालुक्यातील आहेत. कारखाना बंद झाल्यानंतर देखील मजुरांकडे पैसे फिरत असल्याने दत्ता गव्हाणे या मुकादमाने महिला-पुरुष, बालकांसह १४  जणांना डांबून ठेवले आहे. तशी तक्रार मजुरांच्या नातेवाईकांनी बीड पोलीस अधीक्षकांना समक्ष भेटून दिली आहे. कामगार दिनाच्या दिवशीच डांबून ठेवल्याची घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

डांबून ठेवल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऊसतोड मजूर कामगारांना डांबून ठेवल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याचा तपास विभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. डांबून ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे भारतीय दंड संहिता कलम 365, ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार दाखल करण्यात आला. अशी माहिती सहायक पोलीस उपाधीक्षक सुनील लांजेवार यांनी सांगितले तसेच या संपूर्ण तपासाकरिता एक पथक तयार केले असून मजुरांचा शोध घेतला जात आहे.

 हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जांभुळखेडा-पुराडा पुलावर हुतात्मा स्मृती स्थळ उभारणार – दत्ता शिर्के

आमच्या पिढीसाठी जिल्हा परिषद नेतृत्व उभारणारी शाळा : डॉ. नितीन राऊत

Comments are closed.