Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरण : न्यायालयाने पोलिसांचा अर्ज फेटाळला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 06 सप्टेंबर :-    मुंबईमध्ये १३ जुलै २०११ रोजी ओपेरा हाऊस , झवेरी बाजार आणि दादर कबुतर खाना येथील बस स्टॉपवर बॉम्बस्फोट झाले होते. ह्या तिहेरी बॉम्बस्फोटाने त्यावेळी मुंबापुरी हादरली होती. या बॉम्बस्फोटा २६ जणांचा मृत्यू तर १३० जण जखमी झाले होते. जानेवारी २०१२ मध्ये एटीएसने नकी अहमद, नदीम अख्तर, कंवरनैन पाथरेजा आणि हारून रशीद नाईक या चार जणांना अटक केली होती. तसेच फरार दहशतवादी आरोपी यासीन भटकळ हा या तिहेरी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने दिल्लीहून मुंबईला नकीकडे स्फोटके पाठवली. ती त्याने चोरलेल्या दुचाकीमध्ये ठेवल्याचा आरोप आहे.

मुंबई शहरात २०११ मध्ये झालेल्या या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित आरोपी एजाज सईद शेखला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्या संदर्भातील पुरावा असलेली सीडी तपास यंत्रणेला आता मिळत नाही. त्यामुळे ती सीडी मिळेल, त्यावेळेस सादर करण्याची परवानगी देण्यासाठी मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता. मात्र मुंबई पोलिसांनी दाखल केलेला मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

न्यायालयाने नोंदलेल्या निरीक्षणानुसार आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात तथ्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपींना आरोपपत्रासह दाखल केलेली सर्व कागदपत्रे प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तरीही तक्रारदाराने सर्व निर्देशांचे पालन केले नाही. रेकॉर्डवर सीडी सादर केली गेली नाही आणि त्याची प्रत आरोपींना प्रदान केली गेली नाही, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे.

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एसीबीच्या जाळ्यात फसला अहेरीचा पोलीस निरीक्षक

Comments are closed.