Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईच्या महापौरांना अज्ञात व्यक्तीचा फोन जीवे मारण्याची धमकी

22 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास हा फोन आला होता.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, 06 जानेवारी :-  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार, 22 डिसेंबर रोजी महापौर किशोर पेडणेकर यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्याने अर्वाच्च भाषेत शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीच्या फोनमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी आझार मैदान पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास हा फोन आला होता. समोरील व्यक्ती ही हिंदी भाषेतून बोलत होती. त्याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर किशोरी पेडणेकर यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाबाबत पोलिसांनी अत्यंत गुप्तता बाळगली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. हा फोन शेजारील राज्यातून आल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच या व्यक्तीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.