कोरोनानंतर बर्ड फ्लूचं मोठं संकट
हिमाचलमध्ये आणि पंजाबमध्ये साधारण 1,900 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
बर्ड फ्लूचं 7 राज्यांमध्ये मोठं संकट.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
तिरुवअंनतपुरम डेस्क, 06 जानेवारी :- कोरोनाचा नवा स्ट्रेन वाढत असतानाच आता बर्ड फ्लूचं संकट वाढलं आहे. 7 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाल्यामुळे आता अलर्ट जारी करण्यात आला आहे. बर्ड फ्लूने गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि केरळ या राज्यात धोका निर्माण झाला आहे. या राज्यात मोठ्या संख्येने कावळे आणि इतर पक्षी मृतावस्थेत सापडले आहेत.
माचलमध्ये आणि पंजाबमध्ये साधारण 1,900 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तर हरियाणामध्ये 5 जानेवारीपर्यंत काही शे कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुऴे मृत्यू झाला आहे. तर राजस्थानमध्ये 100 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्या पक्ष्यांमध्ये H5N1 व्हायरस मिळाला आहे.
मध्य प्रदेशात मंगळवारी प्रशासन आणि सरकारनं 15 दिवसांसाठी चिकन, अंडी विकाणाऱ्या दुकानांवर बंदी आणली आहे. मध्य प्रदेशात 25 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत 376हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांचा नमुने चाचणीसाठी पाठवले होते त्यावेळी त्यांच्यात बर्ड फ्लूची लक्षणं दिसून आली आहेत. दुसरीकडे वाढणाऱ्या बर्ड फ्लूमुळे अलाप्पुझा व कोट्टायम या दोन्ही जिल्ह्यात बर्ड फ्लू आढळल्यानंतर आता प्रशासनाने कोंबड्या आणि पक्षी ठार मारण्याचे आदेश दिले आहेत.
Comments are closed.