Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती कलादालनाचे ना. गडकरींच्या हस्ते नागपूरात उद्घाटन

नागपुर मनपा आणि छंद सम्राट बहुद्देशिय संस्थेचे आयोजन : युनिक वस्तूंच्या संग्राहांची अफलातून प्रदर्शनी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर दि. २६ फेब्रुवारी  : जगातील वेगवेगळ्या देशांचे चलनी नोटा, नाणे, वर्तमानपत्र, रिकाम्या काड्यापेट्या, छोट्याशा बाटलीत कलाकुसरीच्या वस्तूंची निर्मिती यासह गाण्यांचे उलटे लेखन, अंध असूनही अतिशय सुंदर मूर्तींची निर्मिती अशा नानाविध अफलातून कला आणि विलक्षण वस्तूंच्या संग्रहाची प्रदर्शनीचे उद्घाटन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती कलादालनाचे आज शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे लोकार्पण केले.

नागपूर महानगरपालिका आणि छंद सम्राट बहुद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय नागपुरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे युनिक कलेक्शन आणि कला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहातील तळमजल्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती कलादालन सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फित कापून या कलादालनाचे लोकार्पण केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते ।
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती या अनुषंगाने २३ जानेवारीला गांधीसागर तलाव मार्गावर ७५ मीटरच्या कॅनव्हॉसवर शहरातील कलावंतांनी आपली कलाकृती साकारली. या कलाकृतीचेही प्रदर्शन नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती कलादालनात लावण्यात आले आहे. वस्तू संग्रह प्रदर्शनीसह या कलाकृतींची यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अन् वेळेतच पोहोचल्याने अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला…

धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

 

Comments are closed.