Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल सप्ताहाचा केला निषेध…

भव्य शांतता रॅलीचे पोलीस प्रशासनाने एटापल्लीत केले आयोजन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ७ डिसेंबर : आज दिनांक ७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळच्या सुमारास पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांचे संकल्पनेतून, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (प्राणहिता) अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली एटापल्ली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ते डॉ बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहार अशी PLGA नक्षल सप्ताहाचा निषेध म्हणून भव्य शांतता रॅली काढण्यात आली.

या शांतता रॅलीसाठी भगवंतराव महाविद्यालय व माध्यमिक आश्रमशाळा चे ३०० विद्यार्थी व त्याच बरोबर १०० इतर व्यापारी लोक, सर्वसामान्य नागरिक हजर होते. नमूद रॅलीमध्ये शाळकरी विद्यार्थी यांनी काळ्या फिती लावून नक्षलवादी विचारसरणीचा निषेध केला. रॅलीला विद्यार्थी आणि नागरिक, व्यापारी संघटना यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. बुद्धविहार येथे राष्ट्रगीत गाऊन रॅली चा समारोप करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी विद्यार्थी व उपस्थित नागरिकांना बिस्किटे, चॉकलेट व चहापाण्याची सोय करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, प्राचार्य श्यामराव बुटे, मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे यांचेसह पोलीस व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

 

 

हे देखील वाचा :

वाघाच्या दहशतीने शाळा महाविद्यालय बंद

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती – राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका!.. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

 

 

Comments are closed.