Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दक्षिण गडचिरोली मधील अतिवृष्टीमुळे तलावांची दयनीय अवस्था .

या प्रकरणी जिल्हा नियोजन अधिकारी यांचे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग गडचिरोली यांना कार्यवाही करण्याचे आदेश .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 12,ऑक्टोबर :-  दक्षिण गडचिरोली मध्ये अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व मुलचेरा अशा अतिदुर्गम समजल्या जाण्याऱ्या भागात पाच तालुक्यांचा समावेश होतो. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील बहुतांश तलावांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. या भागातील माजी मालगुजारी (मामा) तलाव व वनतलाव यांचे बांध फुटलेले असून
त्यामुळे साठवणूक झालेले पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्याच्या काळात या तलावांमध्ये पाणी राहणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.

या भागातील हे तलाव वन्यप्राण्यांसाठी पाण्याचे फार मोठे स्त्रोत असून , या तलावाच्या पाण्याचा आदिवासी बांधव शेतीच्या सिंचनाकरिता उपयोग करीत असतात. त्याप्रमाणे तलावात मासेमारी करुन गावातील लोक उदारनिर्वाह सुध्दा करीत असतात. या तलावांना अतिवृष्टमुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने, या भागातील जनतेची जीवनदायी समजल्या जाणाऱ्या या तलावांचा भविष्यात काहीही उपयोग होणार नाही व कालांतराने हे तलाव नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी मामा तलाव वनतलावाची भौतीक तपासणी करून त्याच्या दुरुस्तीसाठी व खोलीकरणासाठी आवश्यक ते प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधीत विभागांना निर्देश दयावे व चालु आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक नियोजनात या कामाचा निधी उपलब्ध करुन दयावा. व सदरील तलावांना पुनरुजीवीत करावे अशी या भागातील जनतेची मागणी आहे. या संदर्भातील पत्र उमाजी आडकुनी गोवर्धन सामाजिक कार्यकर्ता, आलापल्ली यांनी दिले आहे. या विषया संदर्भात जिल्हा नियोजन अधिकारी गडचिरोली यांनी कार्यकारी अभियंता , गडचिरोली पाटबंधारे विभाग यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षलचे पुरून ठेवलेले साहित्य हस्तगत करून केले निकामी.

 

Comments are closed.