Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बस तिकीट दरवाढीचा निषेध व चक्का जाम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वाखाली विजय श्रुंगारपवार सह संपर्क प्रमुख गडचिरोली जिल्ह्या यांच्या उपस्थितीत दिनांक 29 स्थानिक बस स्थानक गडचिरोली येथे धरणे आंदोलन करण्यात आले. नुकताच राज्य शासन बस तीकिट दरवाढीचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना पक्षातर्फे गडचिरोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. लाडकी बहिण योजना अंमलात आणल्या पासून राज्यात जिवन आवश्यक वस्तूंची कमालीची दरवाढ राज्यातील सत्ताधारींनी सपाटाच लावला असुन याचाच एक भाग बस तिकीट दर वाढ निर्णय घेतला असून या निर्णया विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गडचिरोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी नंदुभाऊ कुमरे सुनील पोरेड्डिवार राजेंद्र लांजेकर किरण शेडमाके पवन गेडाम संदिप वाघरे गोविंदा बाबनवाडे प्रशिक झाडे हिंमत भुरसे रामगिरवार सर विजय पत्तीवार.आणि बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.