Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आर. विमला नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नागपूर : जलजीवन मिशनच्या संचालक आर. विमला यांची शुक्रवारी नागपूर जिल्हाधिकारी पदावर बदली झाली असून शनिवारी तडकाफडकी त्यांनी पदभार स्विकारला.

२००९ च्या आयएएस बॅचच्या अधिकारी असलेल्या आर. विमला यांनी यापूर्वी राज्य ग्रामीण आजीविका मिशन (एमएसआरएलएम) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. गेल्या २७ वर्षात आर. विमला यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यात लघु उद्योग विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, करमणूक शुल्क आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन उपायुक्त आणि दादासाहेब फाळके फिल्म सिटीच्या सहव्यवस्थापक संचालक आदी पदांचा समावेश आहे. राज्यातील मनरेगाच्या अंमलबजावणीतही त्यांनी उपसचिव म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

ग्रामीण महाराष्ट्रात महिला सबलीकरणासाठी त्यांनी २०१६ पासून कार्य केले आहे. एमएसआरएलएमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी स्वयं-सहायता गट (एसएचजी) आणि समुदाय-आधारित संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात बदल घडवून आणविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्विकारल्यानंतर शनिवारी आर. विमला यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कोव्हिड नियंत्रण आणि व्यवस्थापनाबाबत चर्चा केली.

हे देखील वाचा :

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी प्रत्यक्ष शेतात जावून केली भात रोवणी

चार वर्षीय इशान्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; तीन मिनिटात ओळखले तब्बल १९५ ध्वज

वाहतूक पोलीसांशी हुज्जत व शिवीगाळ करणे पती-पत्नी दांपत्याला पडलं महागात!

 

Comments are closed.