Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा समिती गठीत करण्याबाबत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 27 जानेवारी : मा.धर्मादाय आयुक्त,म.रा.मुंबई यांचे वतीने यंदा गडचिरोली जिल्हयातील आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहीद जवान, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या इसमांची मुले, बेघर, पारधी समाज, गरीब गरजू, ऊसतोड कामगार,भटक्या जमाती, विमुक्त जाती,अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय यांची मुले-मुली व अनाथ मुले-मुली इत्यादींचे विवाह सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती,गडचिरोली यांचे मार्फत 1 फेब्रुवारी ते 31 मे 2023 या कालावधीत आयोजित करणे आहे.

करीता सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा समिती,गडचिरोली ही समिती गठीत करणेकरीता गडचिरोली जिल्हयातील धर्मादाय संस्था न्यास यांचे विश्वस्त व वकील यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, गडचिरोली बॅरेक क्र.2, जिल्हा जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ संपर्क साधावा. समिती गठीत झाल्यानंतर उपरोक्त गरीब-गरजु मुली-मुलीचे विवाह हया समिती मार्फत करण्यात येईल असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त गडचिरोली यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पतंगीच्या नायलॉन मांजाने गळा चिरला; बालक गंभीर

 

Comments are closed.