Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिमलगट्टा येथे रिलायन्स जिओ चे टॉवर उभारावे, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दुर्गे यांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

जिमलगट्टा, दि. २९ जानेवारी: जिमलगट्टा येथे जिओचे टॉवर उभारून जिओ नेटवर्क सुरु करावे अशी मागणी जिमलगट्टा येथील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दुर्गे यांनी केली आहे. जिमलगट्टा परिसरात जवळ पास 30 ते 40 गावे असून मोबाईल धारक वर्ग सुद्धा खूप मोठा आहे जवळ पास 20 ते 25 हजार मोबाईल धारक आहेत तरी जिओ ने जिमलगट्टा येथे टॉवर उभारल्यास परिसरातील ग्राहकास जिओ चा वापर करता येते नुसता ग्राहकाचा नाही. तर जिओ कंपनीची सुद्धा वाढ होईल आणि कंपनीचा फायदा होईल तरी जिओने आपले उत्पन्न व ग्राहकाची मागणी लक्षात घेता टॉवर उभारण्यास काही हरकत नाही कारण गुडीगुडम, मोसम, राजाराम सारख्या लहान गावात सेवा देत आहेत तर इथे तर मोबाईल धारक वर्ग सुद्धा खूप मोठा आहे.

जिमलगट्टा येथे SDPO कार्यालय, पोलीस स्टेशन, आश्रम शाळा, जि.प. शाळा दवाखाना, पुश्पप्रियादेवी कालेज ,ग्रामपंचायत वीजवितरण कंपनी वनविभाग, वनविकास महामंडळ, महसूल मंडळ अशी बरीच कार्यालये आहेत त्यात नेट कार्यालयीन कामासाठी अति महत्वाचे असते तरी जिओने परिसरातील जनतेच्या सेवेसाठी सेवा सुरु करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दुर्गे यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.