युनेस्को स्कुल ऑफ महाराष्ट्र ऑनलाईन कोविड मुक्त भारत राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत देशातुन प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली.
गडचिरोली जिल्हातील एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथील रहिवासी रोहीत बंडु मडावी.
मिलिंद खोंड, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 29 जानेवारी:- रोहीत बंडु मडावी याचा कोविड मुक्त भारत या चित्राची भारतात
प्रथम पुरस्कारासाठी निवड गडचिरोली जिल्हातील आदिवासी बहुल एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम अविकसीत, तालुका मुख्यालयापासुन 35 किमी दुर कसनसुर येथील रहिवासी रोहीत बंडु मडावी यांनी लॉकडाऊनचे काळात आपल्यातील उपजत कलेला जागृत करुन विविध प्रकारचे चित्र तयार केले.
त्या कालावधीत कोविड मुक्त भारत या अंतर्गत काढलेल्या चित्राला युनेस्को स्कुल ऑफ महाराष्ट्र
आणि असोसिएशन ऑफ नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने दि. 05 नोव्हेंबर 2020 ते 30
डिसेंबर 2020 या कालावधील ऑनलाईन राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले
होते. कोविड मुक्त भारत या विषयावर ही स्पर्धा देशातील सर्व नागरिकांसाठी खुली होती. या
स्पर्धेत देशातील सर्व राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता.
रोहीत हा एटापल्ली येथे विज्ञान पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. रोहीत बंडु मडावी यांनी सुध्दा या स्पर्धेत ऑनलाईन भाग घेतला व त्याच्या चित्राला संपुर्ण देशातुन प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली. कसनसुर सारख्या अतिदुर्गम, अविकसीत, दळणवळण व वाहतुकीच्या अपुऱ्या सोयी असतांनाही आपल्यातील कला विकसीत करुन संपुर्ण देशात गडचिरोली जिल्हाचे नावलौकीक केले आहे. रोहीत बंडु मडावी यांच्या या यशामुळे गडचिरोली जिल्हाच्या मान मिळाला या साठी त्याला निर्मला हेडो, नागेश गावडे, गुलाब डोंगरवार, रावजी मडावी यांनी प्रोत्साहित केले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय युनेस्के स्कुल क्लब ऑफ महाराष्ट्र आणि असोसिएशन ऑफ नविदिल्ली व कुटुंबातील सर्व सदस्य व मित्र परिवार यांना दिले.
रोहीत मडावी या कार्याची दखल घेत जलसंपदा मंत्री, जयंत पाटील आणि खासदार अशोक नेते याचा हस्ते सत्कार करण्यात आले आहे.
Comments are closed.