Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चामोर्शीत स्टॅम्प पेपरची बेभाव विक्री

Get real time updates directly on you device, subscribe now.

शंभर चा स्टॅम्प विकला जातो 120 ते 150 ला

पं.स. सदस्या धर्मशिला सहारे, माजी सरपंच सुभाष कोठारे यांची कारवाई करण्याची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चामोर्शी, दि. ०२ जानेवारी:- गडचिरोलीजिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्यामध्ये स्टॅम्प सुद्धा लागत आहे. परंतु स्टॅम्पचा तुटवडा असून स्टॅम्प विक्रेता एकच असल्याने मोठ्या प्रमाणात त्यांच्या कडून बेभाव विक्री केली जात असल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या धर्मशिला सहारे, माजी सरपंच सुभाष कोठारे यांनी केली आहे.

100 रुपयाचा स्टॅम्प 120 ते 150 रुपये व 5 रुपयाची कोर्ट स्टॅम्प तिकीट 10 रुपयाला विकली  जात असल्याने नागरिकांना याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून स्टॅम्प विक्रेता एकच असल्याने स्टॅम्पसाठी दिवसभर लाईन मध्ये उभे राहावे लागत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याबाबत प्रशासनाने दखल घेत नागरिकांकडून होत असलेली लूट थांबविण्यात यावी व योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी. अशी मागणी पंचायत समिती सदस्य धर्मशिला सहारे, माजी सरपंच शुभाष कोटारे यांच्या कडून केल्या जात आहे. तसेच चामोर्शी तालुका सर्वात मोठा असल्याने येथे स्टॅम्प विक्रेत्यांची संख्या वाढविण्यात यावी व नागरिकांना न्याय देण्यात यावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.