Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आत्मनिर्भर म्हणजे स्वतःची ओळख निर्मिती-आमदार धर्मराव बाबा आत्राम

अहेरी 37 बटालियनसीआरपीएफ तर्फे गरजूंना शिलाई मशीन व खेळाचे साहित्य वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी 30, मार्च 2023 :- अतिदुर्गम नक्षल प्रभावित गावातील महिलांनी शिलाई मशीनच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक उन्नती करून आत्मनिर्भर बनावे. स्वतःची ओळख दुसऱ्यांना प्रेरणादायी ठरविण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा वितरक आमदार धर्माराव बाबा आत्राम यांनी स्थानिक प्राणहिता 37 बटालियन केंद्रीय रिझर्व पोलीस बलाच्या कार्यक्रमात भामरागड येथे केले. सिविक ॲक्शन प्रोग्राम अंतर्गत सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक जगदिश मीना व कमांडंट एम. एच. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात भामरागड पोलीस स्टेशन अंतर्गत टेकला, बेजुर, कोयनगुडा, हेमलकसा, कीयेर व भामरागड गावातील महिलांना शिलाई मशीनचे वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी तरुणांना खेळात रुची असूनही खेळाचे साहित्य खरेदी करू न शकणाऱ्या धोडराज पोलीस मदत केंद्रातील युवकांना क्रिकेट, व्हॉलीबॉल व फुटबॉलचे साहित्य वितरित करण्यात आले. वितरणावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम उपस्थित होत्या.
ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी डॉ. श्रीनिवासूलू रेड्डी यांच्या मार्गदर्शनात करून मोफत औषधोपचार वितरित करण्यात आला. आदिवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रेला नृत्य सादर केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कमांडंट संतोष भोसले, सह.कमां. स्वागत कैलास, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड नितीन गणपुरे, पोलीस निरीक्षक कुमार सिंह राठोड, पोलीस निरीक्षक नीतू राठी तसेच भामरागड पोलीस स्टेशनचे कर्मचारी व 37 बटालियन केंद्रीय रिझर्व पोलीस प्राणहिता कॅम्प आहेरी जवानांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त करून सीआरपीएफ 37 बटालियनचे कमांडंट एम एच खोब्रागडे तथा ईतर अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

“त्या मुजोर” वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यामुळे राम भक्तांविरुद्ध पोलिस तक्रारीने आलापल्लीत नवा वाद

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.