Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

औरंगाबाद, दि. १ जानेवारी: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालं आहे. औरंगाबादच्या खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधीमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. विधानसभेतली त्यांची भाषणं खूप गाजली. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते अशी त्यांची ख्याती होती.

केशवराव धोंडगे हे पाचवेळा आमदार होते तर एकदा खासदार होते. मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडत असल्याने त्यांना मराठवाड्याची मुलुख मैदान तोफ असंही म्हटलं जात होतं. कंधार तालु्क्यातल्या गऊळ या गावात त्यांचा जन्म झाला होता. पिचलेल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी केशवराव धोंडगे आग्रही होते. त्यांनी अनेक आंदोलनांमध्येही सहभाग घेतला होता. त्यांनी या समाजातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकदा प्रश्न उपस्थित केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.