Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुलींची पहिली शाळा सुरू करण्याच्या ऐतिहासिक घटनेचा शतकोत्तर अमृत महोत्सव 

माळी महासंघातर्फे फुले दांपत्य सन्मान महारॅलीचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

पुणे, दि. १ जानेवारी : भव्य दिव्य चित्ररथाची आकर्षक मांडणी, ढोल-ताशा आणि लेझीम पथकासह  शंखनाद, रंगीबेरंगी फुलांची सजावट आणि रांगोळ्यांच्या पायघड्या अशा चैतन्यदायी वातावरणात काढलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानजोती सावित्रीबाई फुले दांपत्य सन्मान महारॅलीव्दारे फुले दांपत्याचा जीवनपट उलगडला.  निमित्त होते माळी महासंघातर्फे दगडुशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा (समता भूमी) दरम्यान काढण्यात आलेल्या फुले दांपत्य सन्मान महारॅलीचे.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानजोती सावित्रीआई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्त्रियांसाठीशिक्षणाची द्वारे खुली करून देण्याच्या या ऐतिहासिक घटनेला १७५ वर्षे (शतकोत्तर अमृत महोत्सव) पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने फुले दांपत्याच्या या महान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्तकरण्यासाठी आणि भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारकाचे निर्माण तसेच विकास करण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा येथून या महारॅलीला प्रारंभ होऊन पुढे शिवाजी रोड मार्गे फडगेट पोलीस चौकी येथून डाव्या बाजूने गंजपेठ पोलीस चौकी आणि महाराणा प्रतापरोडने गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा अर्थात समता भूमी येथे येऊन सर्व फुले प्रेमींनी फुले दांपत्याला अभिवादन केले. या महारॅलीचा समारोप सावित्रीबाईफुले स्मारक येथे करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या महारॅलीमध्ये माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, या रॅलीचे संयोजक  पुणे शहर अध्यक्ष दिपक जगताप, प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे, माजी आमदार कमल ढोले पाटील, नानासाहेब कांडलकर, रविंद्र आंबाडकर, रुपालीताई चाकणकर, काळुराम गायकवाड, शुभांगी लोंढे, दिपक मानकर, वनिता लोंढे, प्रशांत जगताप, संतोष लोंढे, अश्वीनी कदम,  चंद्रकांत वाघोले, विकास रासकर, स्मिता लडकत, रवि सहाने, हरिष लडकत, संगिता येवलेकर, बाळासाहेब लडकत, योगेद्र लडकत, राजेंद्र लडकत, प्रिती महेत्र, चंद्रकांत दरवडे, मारुती भुजबळ, आरती सहाने, शारदा लडकत, सचिन शिवरकर, राहुल भुजबळ, कविता आल्हाट, गोविंद आल्हाट, रिमा लडकत, नानासाहेब कुदळे, कैलास काठे, अभिजीत भुजबळ, गिरीष झगडे, विजय कोठावळे यांच्यासह  हजारो फुलेप्रेमी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन संगिता येवलेकर यांनी केले.  महिला अध्यक्ष स्मिता लडकत यांनी आभार मानले.                                                                      माळी महासंघातर्फे दगडुशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा (समता भूमी) दरम्यान काढण्यात आलेल्या फुले दांपत्य सन्मान महारॅलीत हजारोंच्या संख्येने फुलेप्रेमी सहभागी झाले होते.

हे देखील वाचा: 

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन

‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Comments are closed.