Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारण्यासाठी 100 एकर जमीन संपादित करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

मुंबई दि. १ जानेवारी : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यास दरवर्षी 1 जानेवारीला शौर्यदिनी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात. त्यामुळे या विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची  100 एकर जमीन शासनाने संपादित करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.

आज दुपारी 12 वाजता ना.रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. आपण राज्य आणि केंद्र सरकार तसेच समाजाच्या वतीने येथे अभिवादनास उपस्थित राहिलो असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऐतिहासिक विजय स्तंभ स्मारकासाठी समाज कल्याण विभाग आणि प्रशासनाने आराखडा तयार केला असून त्यासाठी आवश्यक शंभर एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित घ्यावा. एकदा भूसंपादन निर्णय राज्य सरकार ने घेतला की लगेच विजयस्तंभपरिसरातील अतिक्रमण निर्मूलन करता येईल.स्मारकासाठी ज्यांच्या जमिनी संपादित होतील त्यांना योग्य मोबदला देऊन योग्य पुनर्वसन करावे या मागणीसाठी आपण लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.

भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकासाठी अधिकाधिक निधी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील तसेच संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन संरक्षण मंत्रालयातर्फे काही निधी मिळेल का याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले. यावेळी पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो; रिपाइं चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे;परशुराम वाडेकर; पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे;माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे;  पुणे शहर अध्यक्ष शैलेश चव्हाण; बाळासाहेब जानराव; संजय सोनवने; नगरसेविका हिमालीताई कांबळे; शशिकलाताई वाघमारे ; डॉ विजय मोरे; सुमित वजाळे; उमेश कांबळे आदी अनेक मान्यवर तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

मुलींची पहिली शाळा सुरू करण्याच्या ऐतिहासिक घटनेचा शतकोत्तर अमृत महोत्सव 

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन

 

 

Comments are closed.