Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

नाशिक, दि.1 जानेवारी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीत आज रविवार रोजी पहाटेच्यासुमारास झालेल्या स्फोटानंतर आग लागली. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून अन्य १७ कामगार जखमी झाले आहेत.

या घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येवून भेट देत पाहणी केली.

त्यानंतर त्यांनी दवाखान्यात जाऊन जखमी कामगारांची विचार पूस केली. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे हे देखील उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जिंदाल कंपनीत लागलेली आग भयंकर होती. आगीचे मुख्य कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र याबाबत उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.

या आगीत १९ कर्मचारी जखमी झाले असून यापैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये राज्य शासनाकडून मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमींवर राज्य शासनामार्फत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हे देखील वाचा:

गडचिरोली जिल्ह्यामध्ये १०० टक्के तंत्रज्ञानाचा वापर करून पहील्यांदाच होणार पोलीस शिपाई व चालक पदाची भरती प्रक्रिया

 

 

Comments are closed.