Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेनेतर्फे अहेरीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात हल्ला बोल निदर्शने व निषेध करून निवेदन सोपविले

जाहीर माफी व केंद्रीय मंत्रीपदाची राजीनाम्याची केली मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी २४ ऑगस्ट :शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी आक्षेपार्ह विधान केल्याने मंगळवारी शिवसेना पक्षाच्या वतीने अहेरीतील मुख्य चौकात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख व माजी जिल्हा प्रमुख राजगोपाल सुलवावार यांच्या नेतृत्वात निदर्शने व हल्लाबोल करून निषेध नोंदविले व तहसीलदार यांच्याकडे निवेदन सोपविले.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी वार्तालाप करतांना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्याविषयी जीभ घसरवून एकेरी भाषेत वक्तव्य केल्याने आम्हा शिवसैनिकांचे भावना दुखावले असून नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी तीव्र व एकमुखी मागणी करून यापुढे असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशाराही दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निदर्शने करतांना व निवेदन देतांना शिवसेनेचे अहेरी विधानसभा संघटक बिरजू गेडाम, तालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे, सुभाष घुटे, सचिन गर्गम, लक्ष्मण राऊत, अहेरी विधानसभा महिला संघटिका पोर्णिमाताई इष्टाम, तालुका संघटिका तुळजाताई तलांडे, महेंद्र सुलवावार, मनीष इष्टाम, दिलीप सुरपाम, महेश मोहूर्ले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यशने गाठले किलीमांजारो शिखर; आता स्वप्न आहे एव्हरेस्ट गाठण्याचे!

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य,नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश

Comments are closed.