Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबट्याने घेतला एका सात वर्ष चिमुकल्याचा बळी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

आष्टी, दि. १५ सप्टेंबर : वन विकास महामंडळाच्या कक्ष क्र. २१७ मध्ये दुपारच्या सुमारास बिबट्याच्या हल्यात सात वर्ष चिमुकल्याचे बळी गेल्याची घटना समोर आली आहे. याच वन कक्षापासून चपराळा अभयारण्य असल्याने या ठिकाणी हिस्त्र पशूची संख्या वाढल्याचे समोर येत आहे.

गोंडपिपरी तालुक्यात येत असलेल्या भंगाराम तळोधी या गावातील मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन गोंडपिपरी तालुक्यालगत आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या आष्टी परिसरात आपल्या कुटुंबासह मार्कंडा (कंसोबा) येथे मेंढ्या चराईसाठी वन विकास महामंडळाच्या कक्ष क्र. २१७ मध्ये गेले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यावेळी त्यांच्या सात वर्षीय चिमुकला मनोज तिरुपती देवावर हे सुद्धा सोबत होते. वनकक्षात अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला केला. त्यावेळी कुटुंबियांनी त्या बिबट्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात परिवाराला यश मिळाले नाही. शेवटी मुलगा जागीच गतप्राण झाल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

या चार दिवसाआधी पेपर मिल वसाहतलगत श्रीगणेशाची आरती करण्यासाठी सायंकाळी जात असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्यानी त्या चीमुकल्यावर झडप घातली होती. मात्र पालकांनी त्याचा प्रतिकार केल्याने चिमुकला किरकोळ जखमी झाला असून बिबट्याच्या हल्ल्यातून मोठे संकट टळले असले तरी या बिबट्याचा वावर आष्टी परिसरात राजरोसपणे पहावयास मिळत असून कधी घरच्या कोंबळ्यांंवर ताव मारतो तर कधी गुराडोरांवर हल्ला करून ठार करत असल्याने परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली असल्याने रात्रीचे बाहेर जाणे येणे मोठे कठीण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने वेळीच दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांत जोर धरू लागली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले..

 

Comments are closed.