Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माकडाची शिकार बिबट्याला पडली महागात..आणि झाडावरून पकडल्याने जागीच..

वन कर्मचारी जंगलात गस्त घालत असताना झाडाखाली बिबट्याचा मृतदेह कर्मचाऱ्यांना आढळून आला..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

वर्धा, 23 जून – बिबट माकडाची शिकार करण्यासाठी झाडावर चढला अन झाडावरच सैरभर होऊन शिकार करण्याचा प्रयत्न करीत असताना अचानकपणे झाडाची फांदी तुटली आणि बिबट झाडावरून खाली पडताच बिबट्याच्या डोक्याला जबर गोट्याचा मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या कारंजा येथील घटना.धामकुंड जंगल शिवारात वन कर्मचारी गस्त घालत असताना झाडाखाली बिबट्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना लक्षात येताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

माकडाच्या शिकारीच्या नादात बिबट्याला जीव गमवावा लागला. वनकर्मचारी जंगलात गस्त घालता असताना घटना उघडकीस येताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करत पंचनामा करण्यात आला. बिबट मादी जातीचा असून दोन ते तीन वर्षांच्या बिबट असल्याचे सांगण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.