Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह निमित्त आज देशभरातून हजारो नागरिकांनी केले अभिवादन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नाशिक, 2 मार्च :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराचा सत्याग्रहाचे अभूतपूर्व स्थान आहे, २ मार्च १९३० ला सुरू झालेला हा लढा तब्बल पाच वर्ष चालला होता दलित शोषितांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावे तसेच मंदिर प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मानव मुक्तीचा लढा उभारला होता. या लढ्यामध्ये कर्मवीर भाऊराव (दादासाहेब) गायकवाड यांचा सहभाग होता या घटनेला ९३ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत विविध संघटनांच्या वतीने काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन मेळावा तसेच धम्म संस्कार विधी सोहळ्याचे आयोजन काळाराम मंदिर पूर्व प्रवेशद्वार येथे आयोजित करण्यात आले.
२ मार्च काळाराम मंदीर पुर्वद्वार येथे गुरवारी सत्याग्रहिंना अभिवादन करण्यासाठी धर्मगुरू महंत प्रफुल महाराज, मौलाना अझरुद्दीन शेख सर्व समाजांचे धर्मगुरू यांसह बौद्ध धम्म गुरु भदन्त सुगत, भदन्त आर्यनाग, भदन्त अभयानंद,भदन्त धम्मरत्न, भदन्त,धम्मरक्षित,भदन्त मेत्तानंद,भदन्त सुगत शांतेय यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य अभिवादन आणि महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बौद्ध धर्मगूरु, प्रकाश लोंढे, अर्जुन पगारे, नारायण गायकवाड, पवन शिरसागर व माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनाली जाधव आदिंसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन या सत्याग्रहाची आठवण म्हणून उभारण्यात आलेल्या कीर्तिमान शिलालेखास अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व धर्मगुरूंचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी अनेक आंदोलने केली, अनेक आंदोलनापैकी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे महत्वाचे आंदोलन होते. फक्त हिंदूंनाच नव्हे तर त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३० रोजी सुरु झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. यानंतर दलितांना मंदिर प्रवेश मिळाला. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही काळाराम मंदिराची पायरी चढली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज २ मार्च बहुजन चळवळीच्या इतिहासात महत्वाचा दिवस. याच दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह झाला. या सत्याग्रह आंदोलनात स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांनी सहभाग घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी या सत्याग्रहात सहभाग घेत काळाराम मंदिरात सत्याग्रह करण्याचे ठरवले. मात्र ज्यावेळी सर्वजण मंदिर प्रवेशासाठी काळाराम मंदिर परिसरात गेले. त्यावेळी सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वांनाच मंदिर प्रवेश करण्यासाठी मज्जाव करण्यात आला. आणि यानंतर काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा जवळपास पाच वर्षाहून अधिक काळ सुरु होता.

बाबासाहेबांनी केलेल्या सत्याग्रहास आज ९३ वर्ष झाले असून आज देशभरातून सत्याग्रही भूमीला अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने अनुयायी नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात उपस्थित झाले आहेत, यावेळी सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून अभिवादन करण्यात आले. काळाराम प्रवेशद्वारा जवळ समाज प्रबोधन समाज प्रबोधनाची विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, आज दिव्यांग बांधवांनी बाबासाहेबांच्या आणि सत्याग्रहींच्या स्मृतींना गीतांच्या माध्यमातून डोळस अभिवादन केले. यावेळी नागरिकांनी निळे आणि शुभ्र पांढरे फेटे बांधून आनंद उत्सव साजरा केला यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.