Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आमची राखी बांधून घ्या, एका बहिणीची नक्षल्यांना आर्त हाक, हिंसा सोडून संविधानिक मार्गाने आत्मसमर्पण करा,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,२३ ऑगस्ट : गडचिरोली म्हटल तर पहिले नक्षलवाद आठवतोच आणि कारणही तसंच आहे. मात्र या ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्त्याने यावर्षी जन संघर्ष समितीच्या वतीनी गडचिरोली जिल्यातील अतिदुर्गम भागात असेलेल्या पोलिस बांधवानसोबत राखी उत्सव साजरा करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राखी म्हटले की प्रत्येक भावा बहिणीचा आतुरतेेचा सण शहरात राखी चा एक आठवडा आधीच  बाजारात राख्याची दुकाने सजली असतात आणि बहनीची रेलचैल ही सुरू होते . आवडीनुसार चांगल्यात चांगली राखी घेण्याचा प्रत्येकाचा ध्यास असतो. या शिवाय वेग वेगळी मिष्ठान ची दुकाने सजली जातात . भाऊ पण या      सर्वांगोष्टीची मनात बहिनीप्रती प्रेम वात्सल्याची अपेक्षा ठेऊन वाट बघत असतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आपण या सर्व गोष्टी प्रत्येक वर्षी अनुभवतो सुद्धा परंतु आपल्याच देशातील सरहदी वरती असलेले सुरक्षा जवान या सर्व गोष्टी पासून वंचित असतात .भारतातील प्रत्येक बहिणी करिता आपले कर्तव्य बजावत असतात. तीच अपेक्षा तेच प्रेम आपल्याला त्यांचा कडून सुधा मिळतें ते ही आपलेच भाऊ आपलेही कर्तव्य आपण त्यांना राखी बाधून पार पाडले पाहिजे .यावर्षी हि  जनसंघर्ष समितीच्या वतीनी गडचिरोली जिल्यातील अतिदुर्गम भागात असेलेल्या पोलिस बांधवान सोबत राखी उत्सव साजरा करण्यात आला .

भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील नारगुंडा , ताडगाव व कोठी पोलिस मदत् केंद्रात रक्शाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  महिला वर्गानी  उत्साहाने भाग घेऊन प्रत्येक जवाना बांधवाना  राखी तयार करून बहिणीची कमतरता भासु दिली नाही व तसेच नक्षल्यांनी हींसा, अत्याचार सोडुन संविधानिक मार्गाने आदिवासी बघिणीची राखी स्वीकारावी व त्यांची रक्षा करावी अशी संदेश सांगणारी राखी दुर्गम भागातील झाडाला बांधुन नक्षल्यांच्या सुपूर्त करण्यात आली.

हे देखील वाचा,

वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक

वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक

भानामतीच्या संशयावरून दलित महिला – वृद्धाना दोरीने बांधून मारहाण

Comments are closed.