Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गाव व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करा

- बोळधा येथे मुक्तीपथ ग्रापं समिती गठीत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
गडचिरोली देसाईगंज तालुक्यातील बोळधा येथे मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती गठीत करण्यात आली. तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन गाव व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी सरपंच भाग्यश्री गायकवाड, उपसरपंच राजेंद्र गायकवाड, तंमुस अध्यक्ष दिनेश साखरे, ग्रामसेवक गुरुदेव नाकाडे, पोलिस पाटील खुशाल मस्के, ग्रापं सदस्य पुरुषोत्तम नेवारे, मेघश्याम मेश्राम, आनंदा आळे, रेखा नाकाडे, राजेंद्र नाकाडे, गुरुदेव सेवा मंडळाचे नेताजी गजपुरे, ग्रामसंघाचे अध्यक्ष दिनेश साखरे, अंगणवाडी सेविका माधुरी गायकवाड, दारूबंदी समितीचे अध्यक्ष वच्छला नंदेश्वर, आरोग्य सेविका कोरे, वंदना गुळदे, मांढरे, छाया मेश्राम आदी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी मुक्तीपथ ग्रामपंचायत समितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे वाचन करण्यात आले व समितीचे पुनर्गठन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सहसचिव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. याप्रसंगी कलम १८८, २७२, २७३, ग्रामपंचायत अधिनियम दारू बंदी कायदा, पेसा कायदा, अल्पवयीन मुलांचा संरक्षण कायदा, साथरोग कायदा, सुगंधित तंबाखू गुटखा बंदी कायदा, अन्न व औषध मानके कायदा इत्यादी कायद्याची अंमलबजावणी करून आपले गाव दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी काय करता येईल व व्यसनापासून कसे दूर राहता येईल, याबाबत समजावून  सांगण्यात आले. समिती बैठकीचे संयोजन करीता मुक्तिपथ वडसा तालुका संघटिका भारती उपाध्ये व प्रेरक अनुप नांदगिरवार उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.