Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भोंदू बाबाचा भांडाफोड; जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

पोलिसांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला भांडाफोड.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नांदेड, दि. ७ फेब्रुवारी : बिलोली तालुक्यात असलेल्या कसराळी येथील भोंदू बाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अनिस) भांडाफोड केला आहे. कसराळी गावात दस्तगीर दर्गा असून त्या दर्ग्यावर तौफिक बाबा (भोंदू बाबा) असतात. स्थानिक तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या गावातील लोक कुठलाही आजार अथवा समस्यां  निर्माण झाल्यास समस्याचे निराकरण करण्यासाठी त्या भोंदू बाबाकडे जातात. त्यावेळी भोंदू बाबा आजार, समस्याग्रस्तांकडून २५१ ते १००१ रुपयांपर्यंत शुल्क आकारत असल्याची माहिती भक्त सांगत असतात.

या भोंदू बाबाकडे लोक आपली समस्या घेऊन जातात त्यावेळी भोंदू बाबा समस्या घेऊन गेलेल्या लोकांना म्हणतात तुमची समस्या किंवा आजार जादुटोणा किंवा करणीमुळे निर्माण झाली आहे. असे सांगून पाच पन्नास लोकांसमोर अंगात दैवी शक्ती असल्याचा भास तौफिक बाबा (भोंदू बाबा) निर्माण करतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काही सिवसापूर्वी ईरन्ना बोरोड या माणसाचा पाय दुखत असल्यामुळे उपचारासाठी तो तौफिकबाबाकडे गेला असता त्याला भोंदू बाबांने अंगात आल्याचे भासवून “तुमचा त्रास दवाखान्यातल्या नसून रूक्‍मीनबाई बोरोड यांनी तुमच्यावर जादूटोणा केल्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असल्याचे सांगितले. नाव सांगितल्यामुळे रूक्‍मीनबाईकडे लोक संशयाने बघायला लागले. त्यांच्याशी वादावादी-भांडण करू लागले. याबाबत रूक्‍मीनबाई यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेड यांच्याकडे तक्रार दिल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांची मद्दत घेऊन या भोंदू बाबाचा भांडाफोड केलेला आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“या” शहरातील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार : राज्य सरकारचा मोठा निर्णय

चक्क! मृत कामगाराचा मृतदेह कंपनीच्या गेटसमोर ठेवत कामगारांचे आंदोलन

धक्कादायक! शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी..

 

 

 

 

Comments are closed.