Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चक्क! मृत कामगाराचा मृतदेह कंपनीच्या गेटसमोर ठेवत कामगारांचे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नवी मुंबई, दि. ७ फेब्रुवारी : येथील महापे एमआयडीसीमधील एलअँडटी कंपनीसमोर कामगारांनी एका सहकामगाराच्या मृत्यूनंतर धरणे आंदोलन केले आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मृत कामगराचं शव कंपनीच्या गेटसमोर ठेवत हे आंदोलन केले आहे.

शुक्रवारी  दि. ४ फेब्रुवारी रोजी एलअँडटी कंपनीत औषध फवारणी करत असताना लोखंडी रॉड पडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. मृत कामगार विनोद भोईटे याला कंपनीतर्फे आर्थिक मदत तसेच त्यांच्या मुलीला पात्रतेनुसार नोकरी देण्याची मागणी भोईटे कुटुंबीयांसह कामगार संघटनांनी केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र ही मागणी अद्याप पूर्ण होत नसल्याने कामगारांनी एलअँडटी कंपनीच्या गेटवरच मृत कामगार विनोद भोईटे याचा मृतदेह आणत मागणी मान्य होई पर्यंत या मृतदेहासह हे आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा कंपनी प्रशासनाला दिला. यावेळी मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून अंत्यविधी साठी तात्पुरते हे आंदोलन थांबविले असले तरी भोईटे कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया कामगार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी..

पोलीस स्टेशनवर हल्ला! फर्निचर, काचा ची केली तोडफोड..

नववधूची पाठवणी सजविलेल्या बैलगाडीतून!

 

Comments are closed.