Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी..

जालन्यातील शासकीय महिला व बाल रुग्णालयातील धक्कादायक घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

जालना, दि. ७ फेब्रुवारी : येथील शासकीय महिला व बाल रुग्णालयातून रात्री जन्मलेल्या बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. जालना तालुक्यातील परेगाव येथील रुकसाना अहेमद या महिलेला काल प्रसूतीसाठी महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री ११ वाजता या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला.

सकाळी एका महिलेने बाळाला गरम पाण्याने आंघोळ घालण्यासाठी पाणी देते म्हणून रुकसाना या महिलेच्या जावेला रुग्णालयात पाणी आणून बाळाला आंघोळ घातली. रुकसाना यांची जाऊ बाहेर जाताच डोळ्याचे पाते लवते न लवते तोच या महिलेने बाळाला घेऊन पोबारा केल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कदीम जालना पोलिसानी धाव घेऊन या प्रकरणी तापास सुरु केला आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ही तापास सुरु करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेने शासकीय महिला व बाल रुग्णालय परिसरात एकच खबळ उडाली आहे.वार्डातून बाळाची चोरी झाल्याने रुग्णालय परिसराच्या सुरक्षेवर प्रश्न एरणी आला आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोलीस स्टेशनवर हल्ला! फर्निचर, काचा ची केली तोडफोड..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १४ फेब्रुवारीला अनावरण

धक्कादायक ! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अनैतिक संबंधातून महिला करायची ब्लॅकमेल

 

 

Comments are closed.