Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आशा दोंदे याची धडपड…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नाशिक, दि. ७ फेब्रुवारी :  गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे, शाळा बंद झाल्या आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास सुरू झाले. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत, रिचार्ज करायला पैसे नाहीत, अशा परिस्थितीत मुलांना शिक्षण द्यायचे कसे..? पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी, धुणीभांडी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना उद्योगधंदे बंद झाल्याने प्रचंड नुकसान सोसावे लागले, हातावर पोट भरणारी गरीब कुटुंबे पोटाच्या खळगी भरण्यासाठी धडपड करणाऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा गंभीर प्रश्न आजही उभा ठाकलेला दिसून येतोय.

पोटाची खळगी भरायला पैसे नाहीत, तर् आपल्या मुलांना ऑनलाइन शिक्षण द्यायचे कसे, अशा दुहेरी विवंचनेत गरिबांना प्रचंड हाल सोसावे लागले. अशातच स्लम एरियातील काही मुलांना मुलांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आधार मिळाला तो आशा दोंदे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आशा तुषार दोंदे ह्या नाशिकच्या खुटवड नगरमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहतात, त्यांचे पती खाजगी कंपनीत टेम्पररी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत, आशा दोंदे यांचे शिक्षण बीए (अर्थशास्त्र) पदवी पर्यंत झाले आहे, मिळेल ती नोकरी त्यांची धडपड सुरू होती.

मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे त्यांची नोकरी मिळण्याची संधी हुकली, अशातच गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याची त्यांनी धडपड सुरू केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रिकामटेकडी फिरणारी शालेय मुले पाहून त्यांनी निर्णय घेतला की रिकामी फारणारी मुले स्मार्टफोन नसल्यामुळे अभ्यास करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी अशा मोलमजुरी करणाऱ्यांच्या मुलांना आपल्या घरी बोलावून शिक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली, दोन-तीन मुले येता-येता आज २० ते २२ मुलांना मोफत शिक्षण देत असून सर्व विषय त्या मुलांना अचूक शिकवत असल्याने विद्यार्थीही त्यांच्या घरी येऊन आता आवडीने ज्ञानाचे धडे घेऊन अभ्यास करू लागले आहेत. आपल्या शिक्षणाचा कुठेतरी योग्य उपयोग व्हायला हवा; त्यादृष्टीने त्यांनी शिक्षणाचा मोलमजुरी करणाऱ्या जुनी भांडी घासून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या गरिबांच्या मुलांना एक शिक्षणाचा आधार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, मुख्य म्हणजे त्यांच्याकडे मुलांना शिकवण्यासाठी ब्लॅकबोर्ड ही नाही, परंतु त्यांनी एका लाकडी प्लायवुडच्या तुकड्याचा जुगाड करून त्यावर त्या शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. काही संस्थांच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत मिळाल्यास जास्तीत जास्त मुलांना शिकवण्यासाठी पूर्ण वेळ देण्यास त्यांनी दर्शवली आहे.

आपली छोटी दोन मुले सांभाळून घरातली सर्व कामे आटपून त्या परिसरातील मुलांना आपल्याच घरी बोलावून शिक्षणापासून वंचित झालेल्या मुलांना त्या पुन्हा शिक्षणाची गोडी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे हे प्रयत्न यशस्वीही झाले आहेत,

त्यांचे पती तुषार दोंदे ही त्यांना या शिक्षणाच्या कार्यासाठी आपल्या लहान मुलांना सांभाळण्याचं आणि घरातील जमेल ती कामें करुन वंचित मुले शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी ते मदत करत असतात. स्वतःकडे हक्काचं घर नाही परंतु भाड्याच्या घरात राहून हे दोंदे कुटुंब गरिबांच्या मुलाचा आधार बनल्याचे पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा  : 

भोंदू बाबाचा भांडाफोड; जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

“या” शहरातील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार : राज्य सरकारचा मोठा निर्णय

चक्क! मृत कामगाराचा मृतदेह कंपनीच्या गेटसमोर ठेवत कामगारांचे आंदोलन

 

Comments are closed.