Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

…या गावात टस्कर हत्तीची दहशत, वन विभाग व लोकप्रतिनिधी मात्र नॉट रीचेबल

अखेर ग्रामस्थांनी घेतली हत्ती हटाव मोहीम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंधुदूर्ग  : सिंधुदूर्ग जिल्ह्यात असलेल्या दोडामार्ग मोले गावात टस्कर हत्तीसह मादी हत्तीने व दोन छोट्या हत्तीच्या पिल्यांनी भर वस्तीत येऊन धुडगूस घातल्याने टस्कर हत्तीची दहशत संपूर्ण मोले गावात पसरली आहे.

वनविभागाने हत्तीला गावापासून दूर जंगलात हटविण्यासाठी आतापर्यंत कोणतीच मोहिम हाती न घेतल्याने आज अखेर मोले ग्रामस्थांनीच हत्तीला जंगलात घालविण्यासाठी हत्ती हटाव मोहीम हाती घेतली. मात्र, या थरारक मोहिमेत ग्रामस्थांचा टस्कर हत्तीने पाठलाग केल्याने ग्रामस्थांची पळताभुई थोडी अशी अवस्था झाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेले काही दिवस संपूर्ण दोडमार्ग तालुक्यात अनेक गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी हेवाळे गावातील घाटीवडे, बांबर्डे, सोनावल या गावात दहशतीचे वातावरण हत्तींनी पसरविल्यानंतर आता हत्तीने आपल्या कुटूंबा समवेत आपला मोर्चा मोले गावात वळविला आहे.

मोले गावात रात्रौ १.३० वाजल्यानंतर पहाटेपर्यंत हत्तीची दहशत सुरू असते. ग्रामस्थांनी वनविभागला या  घटनेबाबत माहिती देऊन ही वन विभागाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आज मध्यरात्री नंतर रात्रौ १.३० नंतर मोले गावातील ग्रामस्थांनीच आपला जीव धोक्यात घालून हत्ती हटाव मोहिम आपल्या हाती घेतली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या मोहिमेत हत्तीने ग्रामस्थांवर हल्ला करण्याचा तीन ते चार वेळा पर्यंत केला पण ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला.  फणस पीक मोठ्या प्रमाणात बहरत असल्याने व ते हत्तीचे आवडते खाद्य असल्याने ते खाण्याकरिता हत्ती भरवस्तीत येऊन ग्रामस्थांवर हल्ला करीत आहे.

परंतु या घटनेकडे ना वन वनविभाग, महसूल यंत्रणा, लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार किंवा मंत्री कोणीही लक्ष देत नसल्यामुळे दोडामार्ग येथील ग्रामस्थांकडून या सर्व यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.   

हे देखील वाचा :

कोरोना संसर्ग पसरविणाऱ्या डॉक्टरावर अखेर गुन्हा दाखल!

मासे नेणारा ट्रक तलावात पलटी झाल्याने मासे पकडण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड

 

Comments are closed.