Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी येथे बार्टीच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली:1 ऑगस्ट,  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जिल्हा जात प्रमाणपत्र गडचिरोली या ठिकाणी अभिवादन करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमात श्वेता लक्कावार, कमलेश किरमीरे, मंगेश आंबोलकर, प्रशांत येरमे, भूषण चंदिले ,गोवर्धन करपते, पंकज वासनिक, मनीष गणविर ( प्रकल्प अधिकारी बार्टी)  हे उपस्थित होते . सदर कार्यक्रमात स्वेता लक्कावार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले . बार्टी व जि.जा.प.स गडचिरोली च्या वतीने प्रकल्प अधिकारी मनिष  गणविर यांनी उपस्थितांचे  आभार मानले.

पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. असे ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी गडचिरोली व समतादूत प्रकल्प बार्टीच्या वतीने साजरी करण्यात आली. जग बदल घालुनी घाव मला सांगून गेले भीमराव, हे मानवा तु गुलाम नाहीस तर तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस, जात हे वास्तव आहे गरिबी ही कृत्रिम आहे गरिबी नष्ट करता येऊ शकते जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे, अशा प्रकारचे अण्णाभाऊ साठे यांनी आपले प्रेरणादायी विचार जगासमोर मांडले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या दीड दिवसाच्या शिक्षणातून १३  लोकनाट्य ३ नाटके १३ कथा संग्रह ३५ कादंबऱ्या १५ पोवाडे १ प्रवासवर्णन आणि ६ चित्रपट कथा लिहिल्या. फकीरा ही त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली ही त्यांची गाजलेले गीत अशा अनेक प्रकारच्या कथा-कादंबर्‍या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिल्या.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.