Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चार लाख दुरुस्तीसाठी खर्च करूनही जी.प शाळेतील वर्ग खोलीत गळत आहे पाणी

ग्रांप सरपंच व उपसरपंचाच्या पाहणीत आढळून आले वास्तव . .दुरुस्तीच्या कामाची चौकशी करण्याची सरपंच व उपसरपंचाची मागणी

लोकस्पर्श  न्यूज नेटवर्क

 गडचिरोली १ ऑगस्ट :अहेरी तालुक्यातील  जिल्हा परिषद महागाव बूज येथील शाळेतील इमारतीचे दुरुस्ती बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याने  एका वर्षातच वर्ग खोलीत पावसाचे पाणी गळत असल्याचे महागाव (बु) चे सरपंच पुष्पा मडावी आणि  उपसरपंच संजय अलोणे यांनी शनिवारी केलेल्या पाहणीत आढळून आले त्यामुळे या कामाची चौकशी करून संबधित कंत्राटदारावर कारवाई करून व्यवस्थित दुरुस्त करण्याची मागणी  केली आहे.

     मागील वर्षी चार लाख रुपये खर्च करून शासनाने महागाव बु येथील शाळा इमारतीचे दुरुस्ती बांधकाम मागील मे २०२० करण्यात आले होते परंतु एका वर्षात  शाळेतील  वर्ग ६वी च्या खोलीत पावसाचे पाणी गळत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शाळेतील प्रशासनाने पुढील शैक्षणिक सत्राकरिता  १ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा उद्धेशाने ग्राम पंचायत   सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य यांना बोलावून बैठक घेण्यात आली . त्यावेळी ग्रामपंचायत च्या पदाधिकार्यांना वर्गखोलीतून पावसाचे पाणी गळत असल्याचे  त्यांच्या निदर्शनास आले .

या प्रकाराबाबत ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी शाळेतील मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता त्यांनी मागील वर्षी मे २०२१ महिन्यात दुरुस्ती चे काम करण्यात आले असून या वर्षीच्या एका पावसाने शाळेत पाणी गळत असल्याची माहिती दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या सत्रात शाळा सुरू करण्यात आल्यावर गावातील विद्यार्थी या गळत्या खोलीत बसून शिक्षण कसे घेतील असा प्रश्न शाळेतील शिक्षकांना व ग्रामपंचायत पदाधिकार्यांना पडला आहे.त्यामुळे या शाळेच्या इमारत दुरुस्तीची चौकशी करण्याची मागणी सरपंच उपसरपंच व ग्राम पंचायत च्या पदाधिकार्यांनी केली आहे.

शाळेतील दुरुस्ती बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारनी निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याचे शाळा व ग्राम पंचायत समिती च्या लक्षात आले असून सदर कंत्राटदाराने शाळेतील इमारत बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे केल्याने त्यांच्यावर योग्य चौकशीअंती कार्यवाही करून पुन्हा बांधकाम करून देण्याची मागणी  ग्राम पंचायत प्रशासनाने केली आहे.

या संदर्भात महागाव बु.जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एन देशपांडे यांच्याशीलोकस्पर्श न्यूजच्या  प्रतिनिधी ने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असताना त्या म्हणाल्या ,मागील वर्षी शालेच्या वर्गखोलीच्या दुरुस्तीदरम्यान माझ्याकडे शाळेचा कार्यभार नव्हता.सरकार यांच्याकडे कार्यभार होता. या वर्षीच माझ्याकडे माझ्याकडे महागाव बु येथील शाळेचा कार्यभार आला आहे. कोरोनाचा प्रकोप कमी झाला असल्याने  शाळा सुरु करण्याबाबत काल शनिवारी बैठकीची आयोजन करण्यात आले होते  यामध्ये ग्राम पंचायतपदाधीकार्यांना बोलविण्यात आले होते .त्या दरम्यान त्यांच्या पाहनीदरम्यान वर्ग ६ वीच्या खोलीतील स्लँब व भिंती मधून पावसाचे पाणी गळत असून वर्गखोलीत ठेवण्यात आलेले फुलोरा चे सामान भिजले आहे.त्यामुळे शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्याना गळक्या खोलीत कसे बसवणार असा प्रश्न पडतो आहे.

 

या संदर्भात महागाव बु.चे उपसरपंच संजय अलोणे म्हणाले ,जीप शाळेच्या मुख्याध्यापिकेने शनिवारी शाळेत १ऑगस्ट  पासून शाळा सुरु करण्या बाबत ग्राप पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची बैठक बोलविली होती .त्यामध्ये वर्गखोलीचे निर्जंतुकीकरण करून देण्याची त्यांनी मागणी केली .या वेळी आम्ही शाळेची पाहणी करत असताना वर्ग ६ च्या खोलीतील स्लँब व भिंती मधून पावसाचे पाणी गळत असल्याचे दिसून आले आहे .त्यामुळे मागच्या वर्षीच या खोलीचे दुरुस्तीकरणाचे काम गावातील एका कंत्राटदार मार्फत झाले होते.मात्र काम व्यवस्थित झाले नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या कामाची वरिष्ठ अधिकार्यांनी चौकशी करावी व गळकी वर्गखोली दुरुस्ती चे काम पुन्हा करून देण्यात यावे.

Comments are closed.